Prithviraj Chavan  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्र्यांनी कराडमध्ये मिसळवर मारला ताव !

Mangesh Mahale

विशाल वामनराव पाटील

Karad: कराड दक्षिण मतदार संघातून सलग सातवेळा आमदार असलेले स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर त्यांच्या साधेपणाची झलक आजही चर्चेली जाते. त्याचप्रमाणे आता त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा अनेकदा मतदार संघात शेतात जाऊन कार्यकर्त्यांसोबत जेवण करणे,फेरफटका मारत असतात.

पृथ्वीराज चव्हाण नेहमीच मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे असे म्हणत असतात. रविवारी कराड शहरातील मराठी व्यवसाय असलेले सचिन शिंदे यांच्या रेस्टॉरंटला भरदुपारी अचानक पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. त्यांनी मिसळ ऑर्डर केली.सचिन शिंदे यांच्या रोहित वडेवाले या रेस्टॉरंटमध्ये चव्हाण यांनी मिसळवर ताव मारला.

यावेळी मलकापूरच्या उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, विद्यार्थी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, संजय ओसवाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मिसळची चव घेतल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रियाही दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आवडता खाद्यपदार्थ...

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे. आज खाद्यपदार्थ प्रत्येक राज्याची संस्कृती दर्शवत असतात. वडापाव आपल्या महाराष्ट्राचा, मुंबईचा आवडता खाद्यपदार्थ आहे. तेव्हा व्यवसाय करताना योग्य आणि चविष्ट खाद्यपदार्थांची निवड केल्यास त्याला मोठी मागणी आहे. हॉटेल व्यवसायात मराठी व्यावसायिक यशस्वी होतो, केवळ जिद्द आणि परिश्रम करणे गरजेचे आहे,"

दीपावलीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदार मिसळ खाण्याचा आंनद लुटला होता. शिंदे यांच्यासोबत आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी देखील मिसळवर ताव मारला. मिसळ खाल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मिसळचे पैसे आणि तेथील कामगारांना दिवाळी भेट देखील दिली होती. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी काही दिवसापूर्वी मिसळ खाण्याचा आनंद घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT