Satvashila Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan Wife : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी संतापल्या...! असं काय झालं ?

Amol Sutar

- उमेश भांबरे

Prithviraj Chavan Wife : ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे सातारा जिल्‍हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज दहावा दिवस असून त्‍यात सहभागी आंदोलकांची प्रकृती खालावली आहे. आंदोलकांची प्रकृती खालावत असल्‍याची माहिती मिळाल्‍याने बुधवारी माजी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांच्‍या पत्‍नी सत्त्वशीला चव्‍हाण यांनी आंदोलकांची भेट घेतली.

आंदोलकांवर उपचार करण्‍यास चालढकल होत असल्‍याच्‍या मुद्द्यावरून सातारा जिल्‍हा शासकीय रुग्‍णालय प्रशासनाशी संपर्क करून त्‍यांची कानउघाडणी केली. भविष्य निर्वाह निधी खात्यात तत्काळ जमा करण्याचे आदेश द्यावेत, सीएससी एसपीव्ही कंपनीने कर्मचाऱ्यांची लावलेली बोगस हजेरी व इन्व्हाईस तत्काळ बंद करावेत यासह इतर मागण्‍यांसाठी ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेने सातारा जिल्‍हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे. सहभागी झालेल्‍या आंदोलकांची प्रकृती खालावली आहे. आंदोलकांनी स्थळ सोडून जाण्‍यास नकार दिल्‍याने त्‍यांच्‍यावर त्‍याच ठिकाणी उपचार सुरू असून आंदोलकांची माजी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांच्‍या पत्‍नी सत्त्वशीला चव्‍हाण यांनी भेट घेतली. विविध मागण्‍यांबाबत वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्‍याने ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेने हे आंदोलन सुरू केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या आंदोलनादरम्‍यान त्‍यांनी 'रास्‍ता रोको'ही केला होता. आंदोलन सुरू असल्‍याचा आजचा दहावा दिवस आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हे त्‍यांच्‍या दरे या गावी असल्‍याने त्‍यांना भेटण्‍यासाठी मंगळवारी एक शिष्‍टमंडळ त्‍या ठिकाणी गेले. मात्र, त्‍यांची भेट झाली नाही. दरम्‍यान, साताऱ्यात आंदोलकांची प्रकृती खालावत असल्‍याची माहिती मिळाल्‍याने बुधवारी दुपारी सत्त्वशीला चव्‍हाण यांनी आंदोलकांची भेट घेतली.

भेटीनंतर त्‍यांनी जिल्‍हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधत आंदोलकांच्‍या मागण्‍यांबाबत तोडगा काढण्‍यासाठी योग्‍य ती कार्यवाही करण्‍याची मागणी केली. यानंतर त्‍यांनी आंदोलकांवर उपचार करण्‍यास चालढकल होत असल्‍याच्‍या मुद्द्यावरून जिल्‍हा शासकीय रुग्‍णालय प्रशासनाशी संपर्क करून त्‍यांची कानउघाडणी केली.

यानंतर वैद्यकीय पथकाने त्‍या ठिकाणी येत आंदोलकांची तपासणी करीत औषधोपचार सुरू केले. या वेळी आंदोलकांनी तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्‍याचा इरादा सगळ्यांनी व्‍यक्‍त केला.

(Edited by Amol Sutar)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT