Maratha Reservation Survey Video : मराठा सर्वेक्षणच्या प्रगणकांच्या नेमणुकीची पोलखोल, रोहित पवारांनी 'तो' व्हिडीओ केला शेअर

Rohit Pawar News : मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू आहे.
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Nagar : मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या सर्वेक्षणासाठी नगर महापालिकेने नेमलेल्या पहिली पास कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्हायरल व्हिडीओ झालेल्या कर्मचाऱ्याला फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराचे पडसाद महापालिका कर्मचारी युनियनमध्ये उमटले. नगर महापालिका यातून मराठा आणि इतर समाजामध्ये वाद लावण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोप करीत आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची राज्य मागासवर्ग आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे महापालिका युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले.

Maratha Reservation
या 'वंचित'चं करायचं काय? आघाडीसमोरील पेच कायम! | Mahavikas Aghadi | Vanchit Bahujan Aaghadi

मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून युद्धपातळीवर सर्वेक्षण (Survey) सुरू आहे. नगर महापालिकेने चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नेमणूक केली आहे. पहिली नापास आणि पास अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोनसुद्धा हॅण्डल करता येत नाही. तरीदेखील या कर्मचाऱ्यांनी हाताखाली मुले ठेवून सर्वेक्षण सुरू केले. असे असतानाच महापालिकेतील (Municipal Corporation) वायरमन मदतनीस मनोज कांबळे यांचा मराठा सर्वेक्षणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. Maratha Reservation Survey Video

या व्हिडीओनंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. प्रदीप पठारे आणि इतर अधिकारी यांनी मनोज कांबळे यांना बोलावून घेत फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. याची माहिती महापालिका युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांना मिळाली. अनंत लोखंडे यांनी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये येत मनोज कांबळे यांची बाजू मांडली. यानंतर अधिकारी आणि अनंत लोखंडे यांची बंद केबिनमध्ये यावरून वादविवाद झाला. प्रकरण वाढायला नको, म्हणून अधिकारी यांनी शांत राहण्याची भूमिका घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनंत लोखंडे यांनी या प्रकारावर आक्रमक भूमिका घेतली आहे. अनंत लोखंडे म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाकडून हे सर्वेक्षण सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करून समाजघटकाला आरक्षण देतो. हे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे, तो 2004 च्या आरक्षण कायद्यानुसार सर्वेक्षण सुरू आहे. या कायद्याचा भंग महापालिका करीत असून, या कायद्यांतर्गतच कारवाई केली पाहिजे. मराठा आरक्षणाला आमचे समर्थन आहे.

मराठा समाजाविषयी संपूर्ण आस्था आहे. पण सर्वेक्षणाच्या नावाखाली मनोज कांबळे यांच्याविषयी साधी नोटीस काढण्याचा विचार केल्यास त्याचे परिणाम महापालिका प्रशासनाला भोगावे लागतील. आंदोलन करताना सर्वेक्षणाचे काम सुरूच राहील. परंतु इतर सेवांवर काय परिणाम होईल, हे महापालिका प्रशासनाने लक्षात घ्यावे. राज्य मागासवर्ग आयोग, मुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत हरकत नोंदवत आहोत, असे अनंत लोखंडे यांनी म्हटले आहे.

रोहित पवारांची टीका

मनोज कांबळे यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर शेअर करीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणासाठी तरुण, महिला, वृद्ध, मुला-बाळांसह सामान्य मराठा समाज थंडीगारठ्यात शेकडो किलोमीटर पायी चालत सरकारकडे निघाला आहे. परंतु सरकार घाईगडबडीत सर्वेक्षणाची केवळ औपचारिकता पूर्ण करीत आहे. सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही आणि याचाच पुरावा म्हणजे हा व्हिडीओ. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना त्यांच्याकडून घाईगडबडीत सर्वेक्षण केल्यास भविष्यात आरक्षणाबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सरकारने किमान समाजाच्या भावनांशी न खेळता आणि सर्वेक्षणाची ढोंगबाजी न करता प्रामाणिकपणे आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, ही विनंती! असे आमदार रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

(Edited By Roshan More)

R...

Maratha Reservation
ShivSena Vs Thackeray Group : काम फुकटचं, पण श्रेयवादावरून उभे ठाकले शिवसेनेचे दोन्ही गट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com