Prithviraj Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan on Election Commission: पृथ्वीराज चव्हाण यांचे थेट निवडणूक आयोगाला आव्हान; म्हणाले...

Congress Political News : केंद्रातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची निवडणूक आयोगाने बैठक घेऊन या सर्व यंत्रणेवर विश्वास निर्माण होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

हेमंत पवार - Hemant Pawar

Prithviraj Chavan News : मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी दिवशी अनाधिकृतपणे मोबाईल फोन मतदान केंद्रात आणू दिले. त्याचा वापर इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन उघडण्याच्या ओटीपी जनरेट करण्यासाठी झाल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक आयोगाने तातडीने पत्रकार परिषद घेऊन त्याचे व्यापक स्पष्टीकरण दिले पाहिजे.

केंद्रातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची निवडणूक आयोगाने बैठक घेऊन या सर्व यंत्रणेवर विश्वास निर्माण होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी व्यक्त केले. (Prithviraj Chavan news)

शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या नातेवाईकांवर मुंबई पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर इव्हीएम मशीन पुन्हा चर्चेत आली आहे. यावर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी निवडणूक आयोगालाच आव्हान दिले आहे. ते म्हणाले, मुंबई उत्तरपश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी दिवशी मतमोजणी केंद्रात अनाधिकृतपणे मोबाईल फोन आत आणून दिले. त्या मोबाईलचा उपयोग बाहेर संदेश पाठवणे आणि बाहेरुन संदेश घेणे यासाठी करण्यासह इलेक्ट्रॉनीक व्होटींग मशीन उघडण्याच्या ओटीपी जनरेट करण्यासाठीही त्याचा वापर झाल्याचे सांगितले जात होते.

चार जूनला निकाल जाहीर झाल्यानंतर दहा दिवसांनी 14 जूनला पोलिसांनी त्यासंदर्भात तक्रार दाखल केलेली आहे. त्याची कॉपी तक्रारदारांना देण्यात आलेली नाही. कोणत्याही मोबाईल फोनवर इलेट्रॉनिक मशीन उघडण्याचा ओटीपी जनरेट होतो, इलेक्ट्रॉनिकी ट्रॉन्समीटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम फॉर सर्व्हीस व्होटर या प्रणालीबद्दल मी नवीनच ऐकले आहे. ही प्रणाली हॅक करण्यात आली आहे का ? त्या प्रणलीतील मताची आदलाबदल करण्यात आली आहे का ? याची तपासणी होणे आवश्यक आहे.

किर्तीकरांचा पराभव फक्त 48 मतांनी झाल्याचे दाखवले गेले आहे. त्याच्या अगोदरच्या राऊंडमध्ये ते आघाडीवर होते. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न या घटनेतून निर्माण होत आहेत. निवडणूक आयोगाने तातडीने पत्रकार परिषद घेऊन त्याचे व्यापक स्पष्टीकरण दिले पाहिजे. या प्रश्नावर सध्या जगभर चर्चा सुरू झाली आहे.

एयआय तंत्रज्ञानाचे अलॉन मस्क यांनीही ट्विट करुन इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन हॅक होऊ शकते, असे म्हटले आहे. त्याला राजीव चंद्रशेखर यांनी उत्तर दिले आहे. त्यावर अशी चर्चा करण्यापेक्षा केंद्रातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची निवडणूक आयोगाने बैठक घेऊन या सर्व यंत्रणेवर विश्वास निर्माण होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे. घटलेली घटना ही अत्यंत गंभीर घटना असल्याचेही चव्हाण म्हणाले.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT