Pune Ncp News : राष्ट्रवादीचा दावा कायम; पुण्यातल्या 6 जागा जिंकण्याचा विश्वास, पण निर्णय साहेब घेतील

Ncp Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्हिडिओ प्रसारित करून आपण आपल्या दाव्यावर कायम असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar
Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad PawarSarkarnama

Pune News : लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेच्या जागावरून आघाडीमध्ये चढाओढ सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातील आठ पैकी सहा जागांवरती दावा करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने देखील आठ पैकी सहा जागांवर दावा सांगितला आहे. तर काँग्रेसने यावर दोन्ही शहराध्यक्षांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे, असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्हिडिओ प्रसारित करून आपण आपल्या दाव्यावर कायम असल्याचे ठामपणे सांगितले आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पुणे शहरातील 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघात आपल्या उमेदवार हवा असा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. शहरात पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री अशा अनेक निकषांवर पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. (Pune Ncp News)

शहरातील हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंट या सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार हा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आला, असा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना पाठवला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला आणि पर्वती या चार मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार दिले होते. यावेळी अतिरिक्त म्हणून शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची मागणी आपण करत अजून याबाबतचा सर्वस्वी निर्णय हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) घेतील, असे व्हिडिओच्या माध्यमातून प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.

Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar
Cabinet Expansion : विधानसभेआधी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? 'या' नेत्यांची नावं चर्चेत

जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये (MVA) बिघाडी होण्याची शक्यता असताना देखील हा महाविकास आघाडीतील नेते आपल्या दाव्यावरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकाजवळ येतील तसतसा हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar
Eknath Shinde News : ईव्हीएमबाबत मुख्यमंत्र्यांनी वायकरांची बाजू घेत विरोधकांवर सोडला 'बाण'

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com