Satara News : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक मोहिमांमध्ये वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली होती. त्यामुळे आता भवानी तलवारीपाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं राज्यात येणार आहेत. मात्र, या वाघनखांच्या मुद्द्यावर आता दावे-प्रतिदावे केले जात आहेत. (Latest Marathi News)
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या वाघनखांबाबत भाष्य केले होते. लंडनच्या वस्तुसंग्रहालयात असणारी वाघनखं ही महाराजांनी वापरली होती का? याबाबत सरकारकडे स्पष्टता आहे का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला होता. यावर आता साताराचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आदित्य ठाकरेंना विचारणा केली आहे.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, "वाघनखांबाबत उपस्थित केले जाणाऱ्या शंकांच्या मागे राजकारण आहे. मुद्दामहून याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांनी लंडनमधील ती वाघनखं खोटी आहेत हे सिद्ध करावे, या भावनिक विषयांवर विरोधकांनी राजकारण करू नये, उलट ज्यावेळी ही वाघनखे मुंबईत येतील, त्यावेळी त्यांचे स्वागत करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.