Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : पृथ्वीराज पवारांना जयंत पाटलांच्या द्वेषाची कावीळ; महापौर सूर्यवंशींचा हल्लाबोल

सरकारनामा ब्युरोे

Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कावीळ झालेले भाजप नेते पृथ्वीराज पवार स्वप्नपूर्ती डिस्टिलरीची वकिली का करीत आहेत, असा सवाल महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी मंगळवारी (ता. २१) केला.

जयंत पाटील यांनी सोमवारी (ता. २०) विधानसभेत वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा आसवणी प्रकल्प स्वप्नपूर्ती कंपनीतर्फे चालवला जात आहे. त्याकडे लक्ष वेधत कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा उचलून धरला होता. त्यावर आज सांगलीत पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार परिषद घेत आज जयंत पाटील यांना लक्ष्य केले होते.

त्यावर जगदाळे म्हणाले, "गेल्या तीस वर्षांपासून राजारामबापू साखर कारखाना वारणा नदीचे प्रदूषण करीत आहे. या काळात पवार यांचे वडील संभाजीराव हे कोणासोबत होते? ते देखील त्या काळात साखर कारखाना चालवत होते, हे ते विसरले का? राजारामबापूसह सर्वच कारखान्यांविरोधात प्रदूषणाच्या तक्रारी आहेत. त्याचा निर्णय न्यायालय करेल. पृथ्वीराज पवार (Pruthwiraj Pawar) यांनी न्यायाधीश व्हायची गरज नाही. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जिल्ह्याचे नेते म्हणून हा मुद्दा मांडला. त्याचबरोबर हा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी शेरीनाला योजनेच्या 'एसटीपी'साठी ६२ कोटी रुपये निधीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली."

पवारांना भाजप काठावरच बसविणार असल्याचे सांगून सूर्यवंशी यांनी गाडगीळ यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, "जयंत पाटील (Jayant Patil) सांगलीसाठी विधानसभेत आवाज उठवतात. मात्र पवार ज्या आमदार सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांचे नेतृत्व‍ मान्य करतात, त्यांनी अशी मागणी का केली नाही? ते का विधानसभेत बोलले नाहीत? पवार यांना जयंतरावांची द्वेषाची कावीळ झाली आहे. त्यांची आजवरची कारकिर्द सर्व लोकांसाठी नसून जयंतरावांवर टीका करण्यासाठी गेली. त्यांचा असा समज आहे की, जयंतरावांवर टीका केली तर पक्षात त्यांची किंमत वाढेल. मात्र भाजप त्यांचे रात्रीतील पक्षांतर विसरलेला नाही. त्यांना भाजप काठावरच बसवणार."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT