Threaten to Nitin Gadkari : मंत्री गडकरींना पुन्हा धमकीचा फोन? १० कोटी रुपये खंडणीची मागणी

Nagpur News : हिंडलगा कारागृहातून फोन गेल्याचा संशय
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा हिंडलगा कारागृहातील एका कैद्याकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे मंगळवारी (ता. २१) उघडकीस आले आहे. मंत्री गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयाशी संपर्क साधून खंडणीसाठी धमकी दिली. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी याला दुजोरा दिला नसल्याने संभ्रम कायम आहे.

Nitin Gadkari
Pimpri-Chinchwad : पिंपरी पालिकेत लिपिक एसीबीच्या जाळ्यात; भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये जुंपली

हिंडलगा कारागृहातून १४ जानेवारीला एका कैद्याने केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपुरातील कार्यालयाशी संपर्क साधून १०० कोटींची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास बॉम्बने उडविण्याची धमकी दिली होती. महाराष्ट्र पोलिसांनी तपास केल्यानंतर हा फोन हिंडलगा मध्यवर्ती कारागृहामधून आल्याचे स्पष्ट झाले. कॉल करणाऱ्या संशयिताची चौकशी सुरु आहे.

त्या प्रकरणाचा तपास सुरु असताना पुन्हा एकदा मंत्री गडकरी यांच्या नागपूर (Nagpur) कार्यालयाशी संपर्क साधून १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. संबंधिताने मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास नागपूरमधील ऑरेंज सिटी हॉस्पिटलजवळील मंत्री गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयातील दुरध्वनीवर संपर्क साधून धमकी दिली. त्यामुळे, कार्यालय बंद करुन बंदोबस्त वाढविला आहे. फोन कुठून आला व तो करणारी व्यक्ती कोण, याचा तपास एटीएस पथकाकडून सुरु आहे.

Nitin Gadkari
Congress News : सिद्धरामय्यांच्या मतदारसंघावरून काँग्रेसमध्ये महाभारत : कोलारमधून लढण्याचा निर्णय मागे; समर्थकांचे धरणे

संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव जयेश सांगितले आहे. यापूर्वीही या नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला होता. यामुळे पोलिसांनी तेव्हा बेळगावात (Belgaon) दोन ते तीन दिवस मुक्काम ठोकून तपास केला. त्यातून फारशी माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. मात्र, पुन्हा कॉल आल्यामुळे याची गंभीर दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात येत आहे. या प्रकारणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या हालचाली सुरु आहेत. या प्रकारामुळे हिंडलगा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा (P.V,. Sneha) म्हणाल्या की, "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हिंडलगा कारागृहातून धमकीचा कॉल गेला आहे वा नाही त्याची माहिती नाही. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अधिक बोलणे योग्य ठरेल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com