Vishal Agarwal Hotel Seal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Agarwal Hotel : अगरवालमुळे महाबळेश्वर, पाचगणीतील पारा चढला; बेकायदेशीर बांधकामांवर पडणार हातोडा...

Vishal Agarwal Case Pune Porsche Car Accident Mahabaleshwar Illegal Construction : विशाल अगरवालने महाबळेश्वरमधील शासकीय जमिनीवर बेकायदेशीर हॉटेल बांधले असून ते सील करण्यात आले आहे.  

Umesh Bambare-Patil

Mahabaleshwar News : महाबळेश्वर येथील शासकीय जमिनीवर बांधलेले विशाल अगरवाल यांचे पंचतारांकित हॉटेल महाबळेश्वर नगरपालिकेने सील केलं आहे. या बांधकामामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महाबळेश्वर व पाचगणी परिसरातील इतर बेकायदेशीर बांधकामांवरही हातोडा टाकण्याचे आदेश दिले आहेत.

अगरवाल यांचे हॉटेल शनिवारी सील केले आहे. तसेच बेकायदेशीर बांधकामही काढून टाकण्यात येणार असल्याचे सातारा जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. लवकरच इतर बेकायदेशीर बांधकामेही पाडली जाण्याची शक्यता असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

महाबळेश्वर व पाचगणी परिसरात शासकीय जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहे. याबाबत सातत्याने लोकप्रतिनिधींकडून आवाज उठवला जात आहे. पण, स्थानिक पालिका प्रशासन किंवा महसूल विभागाकडून कोणतीही हालचाल होत नव्हती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याणीनगर पोर्शे कार अपघातातील मुख्य आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन उघड झाल्यानंतर त्यांनी शासकीय जमिनीवर पंचतारांकित हॉटेल उभारल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुन्हा एकदा महाबळेश्वर व पाचगणी परिसरातील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या महाबळेश्वर येथील दरे गावी मुक्कामी होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी बेकायदेशीर बांधकामांबाबत विचारल्यानंतर महाबळेश्वरातील अगरवाल असो वा अन्य कोणी बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरवा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले होते.

मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महाबळेश्वर पालिका व वाईचे प्रांताधिकारी यांना सूचना करुन तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विशाल अगरवाल यांचे एमपीजी क्लब हे हॉटेल महाबळेश्वर पालिका प्रशासनाने शनिवारी सकाळी सील केले.

अगरवालच्या हॉटेलमधील बेकायदेशीर बांधकामावर हातोडाही टाकण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अशा बांधकांमवरही लवकर हातोडा पडण्याची शक्यता आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT