Pune Porsche Accident : पोर्श कार अपघात प्रकरणात अजितदादांचा पोलिस आयुक्तांना फोन? स्वतःच दिले उत्तर

Ajit Pawar On CP Call : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री म्हणून मी पोलिसांना आरोपींवरती कडक कारवाई करावी, या संदर्भातील सूचना दिल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.
Amitesh Kumar Ajit Pawar
Amitesh Kumar Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये सातत्याने स्थानिक आमदार सुनील टिंगरे सुनील टिंगरे यांच्यावर दबाव आणल्याच्या आरोप होत आहे. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील या प्रकरणांमध्ये विरोधकांकडून टार्गेट करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता या आरोपांना खुद्द अजित पवारांनी उत्तर दिले आहे.

'मी पोलिस कमिशनर यांना कोणत्या ना कोणत्या कामासाठी वरचेवर कॉल करत असतो. मात्र या प्रकरणात मी सीपींना कोणताही कॉल केलेला नाही.', असे म्हणत अजित पवार Ajit Pawar यांनी विरोधकांनी केलेला आरोप स्पष्ट शब्दातच फेटाळला आहे.

कल्याणी नगर अपघात प्रकरणात मी पोलिस आयुक्तांना काही सांगितले नाही. तसे सांगितले असते तर मी याबाबत बोललो असतो आणि जर मी पोलिस आयुक्तांना Amitesh Kumar कॉल केला असता तर त्यांना मी या घटनेमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा, अशा सूचना लोकप्रतिनिधी म्हणून मी दिल्या असत्या, असे स्पष्टीकरणही अजित पवार यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amitesh Kumar Ajit Pawar
Shashikant Shinde : 'महाविकास आघाडी महाराष्ट्रात 30 ते 35 जागा जिंकेल', शिंदेंना ठाम विश्वास

कल्याणी नगर अपघात प्रकरणांमध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री म्हणून मी पोलिसांना आरोपींवरती कडक कारवाई करावी, या संदर्भातील सूचना दिल्या आहेत. जे गुन्हेगार असतील त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. विरोधकांकडून टीका करण्यात येत असली तरी तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं अजित पवार यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Amitesh Kumar Ajit Pawar
Lok Sabha Election 2024 : पोलिसांच्या 'या' आदेशामुळे विजयानंतरही कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार; कारण काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com