Pune primary schools sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

School Timings Changed : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! दोन महिन्यांसाठी बदलल्या शाळांच्या वेळा, आजपासूनच नवे नियम लागू

Pune Municipal Corporation Announces New School Timing Schedule : पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांच्या वेळेतील तात्पुरत्या बदलांची माहिती तातडीने पालकांपर्यंत पोहोचवावी असे कडक निर्देश दिले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Primary School Timing Notification News : मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची सूचना मागच्या वर्षी तत्कालीम राज्यपाल रमेश बैस यांनी केल्यानंतर शाळेच्या वेळेत बदल करण्यात आलं होतं. मात्र आत्ता सर्वत्र पाऊस सुरू झालेलं असताना पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या कामासाठी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या, मनपा आणि खाजगी प्राथमिक शाळांच्या वेळेत १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी मोठा बदल केला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या कामासाठी शिक्षकांना वेळ उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे, या दुहेरी उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून १ जुलै ते ३१ ऑगस्ट पर्यंत आत्ता शाळा सकाळी ७.०० ते दुपारी १२.१५ असणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे आणि उप आयुक्त वसुंधरा बारवे यांनी सर्व मनपा व खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना कडक निर्देश दिले आहेत की, शाळांच्या वेळेत झालेल्या या तात्पुरत्या बदलाची माहिती तातडीने पालकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. हा बदल ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ रोजी महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक आणि दोषविरहित करण्यासाठी शिक्षकांची भूमिका 'मतदान केंद्रस्तरीय अधिकारी' म्हणून अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

तर शिक्षकांना संपूर्ण वेळेसाठी बीएलओ म्हणून नियुक्त न करता, त्यांना सुट्टीच्या दिवशी आणि शाळा सुटल्यानंतर शैक्षणिक कामाच्या वेळेनंतर हे राष्ट्रीय काम करता यावे, यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ घेऊन आणि अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने शाळांच्या वेळेत हा बदल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT