Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेकडून छत्रपती शिवरायांचा अवमान - काँग्रेसचा आरोप! ; 12 तासांचा दिला अल्टिमेटम, नेमकं काय आहे प्रकार ?

Congress accused Pune Municipal Corporation: ...हा पुणेकर जनतेचा व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचाही अवमान आहे, असा आरोप काँग्रेसने केलेला आहे.
Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेकडून छत्रपती शिवरायांचा अवमान  -  काँग्रेसचा आरोप! ; 12 तासांचा 
दिला अल्टिमेटम, नेमकं काय आहे प्रकार ?
sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानास्पद प्रकार चालू असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेने पुढील बारा तासांमध्ये त्वरित कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असं पत्र काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना दिल आहे.

पत्रात म्हटले आहे की, पुणे शहर हे छत्रपती शिवरायांचे वास्तव्याने पावन झालेले ठिकाण असून पुणे शहराच्या जडणघडणीत छत्रपती शिवरायांच्या विचारसरणीचा मोठा वाटा आहे. उभ्या महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण देशाचे दैवत समजले जाणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पावन भूमीत म्हणजेच पुणे शहरात मनपाकडून(PMC) छत्रपती शिवरायांबाबत अवमानास्पद प्रकार घडत आहे.

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेकडून छत्रपती शिवरायांचा अवमान  -  काँग्रेसचा आरोप! ; 12 तासांचा 
दिला अल्टिमेटम, नेमकं काय आहे प्रकार ?
Dhananjay Munde and Karuna Sharma love story : धनंजय मुंडे अन् करूणा शर्मांची पहिली भेट होती अगदी फिल्मी ; जाणून घ्या, 'Love Story '

तसेच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पुणे शहरात कचरा उचलण्यासाठी लावलेल्या सर्व यंत्रणांवर छत्रपती शिवरायांचे छायाचित्र असलेले पुणे महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी असणाऱ्या गाड्यांवर छत्रपती शिवरायांचा फोटो लावणे हा पुणेकर जनतेचा व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचा अवमान आहे. असा आरोप काँग्रेसने(congress) केला आहे.

याशिवाय, छत्रपती शिवरायांचा(Chhatrapati Shivaji Maharaj) फोटो कचरा गाडीवर लावून मनपाने मराठी अस्मितेशीद्रोह केलेला असून याबाबत पुणेकरांच्या भावना प्रक्षुब्ध आहे. हे पत्र दिल्यापासून १२ तासांच्या आत कचरा गाड्यांवरील छत्रपती शिवरायांचे छायाचित्र असलेले बोधचिन्ह न हटविल्यास पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल व याचे सर्वस्वी जबाबदारी प्रशासन प्रमुख या नात्याने असेल असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेकडून छत्रपती शिवरायांचा अवमान  -  काँग्रेसचा आरोप! ; 12 तासांचा 
दिला अल्टिमेटम, नेमकं काय आहे प्रकार ?
Atul Londhe : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंच्या अडचणी वाढणार?; भाजपच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल!

दरम्यान महापालिकेतून या पत्राची त्वरित दखल घेण्यात आली असून यावर कारवाईला देखील सुरुवात केली असल्यास पालिका प्रशासन सांगण्यात आल आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com