Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मुहूर्त ठरला! आयुक्तांचं गटनेत्यांना पत्र

Co-opted Corporators Appointment : महापौर, उपमहपौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्षांसोबतच विविध समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्तीकडे सगळ्यांच्या नजरा असतानाच आता त्याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
The Pune Municipal Corporation headquarters in Shivajinagar as the co-opted corporators appointment process begins under Commissioner Navalkishor Ram.
The Pune Municipal Corporation headquarters in Shivajinagar as the co-opted corporators appointment process begins under Commissioner Navalkishor Ram.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 25 Feb : पुणे महापालिकेमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये महापौर सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार याबाबतच्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे या चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र आपली स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी लागावी यासाठी अनेक कार्यकर्ते फिल्डिंग लावून बसल्याचं दिसत आहे.

आता महापौर, उपमहपौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्षांसोबतच विविध समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्तीकडे सगळ्यांच्या नजरा असतानाच आता त्याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी नाव देण्याबाबतचे पत्र सर्व पक्षाच्या गटनेत्यांना दिले आहे. त्यानुसार आता भाजपचे 7 राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि काँग्रेसच्या 1 असे दहा स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत.

The Pune Municipal Corporation headquarters in Shivajinagar as the co-opted corporators appointment process begins under Commissioner Navalkishor Ram.
Maharashtra Missing Girls : वर्षभरात महाराष्ट्रातील तब्बल 48 हजार मुली, महिला बेपत्ता; विधानसभेत गृहविभागाचा धक्कादायक खुलासा

दरम्यान पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. तरीही तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. काहींना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले असतानाही त्यांची उमेदवारी अचानक नाकारण्यात आली, तर काहींची उमेदवारी फक्त आमदार, मंत्र्यांचे नातेवाईक असल्याने उमेदवारी नाकारण्यात आली.

काही ठिकाणी बाहेरून आणलेल्या उमेदवारांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा पत्ता पूर्णपणे कट झाला आहे. या सर्व नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्ष नेत्यांकडून आता वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने दिली गेली. यात अनेकांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे वचन देण्यात आले आहे. त्यामुळे हे सर्वजण आता आपल्या पदरात स्वीकृत नगरसेवक पद पडेल अशी आस लावून बसले आहेत.

The Pune Municipal Corporation headquarters in Shivajinagar as the co-opted corporators appointment process begins under Commissioner Navalkishor Ram.
Rajya Sabha Election 2026 : शरद पवारांना राज्यसभेत पाठवण्यासाठी सुप्रिया सुळेंची दिल्लीत लॉबिंग; तर शशिकांत शिंदे जयंत पाटलांच्या मुंबईत भेटीगाठी

एकीकडे या पदासाठी चढाओढ सुरु झालेली असतानाच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेतील सर्व पक्ष गटनेत्यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावांची शिफारस करावी असे पत्र दिले आहे. त्यामुळे आता ही नावे ९ मार्च रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत महापालिका आयुक्तांकडे सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत पक्षाकडून देण्यात आलेल्या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com