पुण्यात स्वीकृत नगरसेवक पदासाठी 10 जागांसाठी तब्बल 400 इच्छुक असल्याने सर्वच पक्षांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही या पदावरून नाराजी व्यक्त होत असून हडपसरमध्ये आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले आहेत.
बॅनरमधून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आमदार आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Pune News : सध्या पुणे महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या उमेदवारीवरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये घमासान रंगल्याचं पाहायला मिळत आहे. दहा जागांसाठी तब्बल 400 जण इच्छुक असल्याने लॉबिंग, आर्थिक व्यवहार आणि नाराजी नाट्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराजी नाट्य सुरू झाले आहे.
पुण्यातील हडपसर परिसरात आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात बॅनर लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनरमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल जात असून आमदार आपल्या मुलाचा बालहट्ट पुरवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.
या बॅनरमध्ये दादांच्या पाठीमागे आमदारसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय का? असा सवाल करण्यात आला आहे. आमदारकी कार्यकर्त्यांच्या कष्टाने पण त्यानंतर कार्यकर्त्यांच्या ऐवजी आपल्याच लाडक्या लेकाला युवक शहराध्यक्ष व त्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी पण घराणेशाहीचाच बालहट्ट व त्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी का? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जुने कार्यकर्ते असताना पण आमदार साहेबांनी लाडक्या लेकाला युवक शहर अध्यक्ष केलं. या सुवर्णसंधीचं सोनं करायचं सोडून आता पक्षाच्या वाट्याला येणारे स्वीकृत नगरसेवक पद पण त्यांच्याच घरी का? असा प्रश्न करण्यात आला आहे.
तसेच आमदारसाहेबांच्या भूमिकेमुळे हडपसरमधील पक्षाची झालेली पिछेहाट बाजूला सारून आता साहेबांची लाडक्या लेकासाठी स्वीकृत नगरसेवकासाठी चाललेली धडपड कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. त्यामुळे नेत्यांच्या हट्टापायी व त्यांच्या कुटुंबासाठी अजून किती दिवस हडपसरमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी दिला जाणार? असा देखील प्रश्न पोस्टरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.
या पोस्टरमध्ये पुढे म्हटले आहे की, अजितदादांचे कार्यकर्त्यासाठी असणारे प्रेम आणि दादांची काम करण्याची जिद्द बघूनच आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते राजकारणात आले आहेत. परंतु दादांच्या पाठीमागे असे कार्यकर्त्याचे खच्चीकरण करून विधानसभा अध्यक्ष आणि आमदार साहेब काय साध्य करू पाहत आहेत हे समजत नाही.
दादांच्या जाण्याने आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आधीच पोरके झाले आहेत. आता त्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे लोक करत आहेत. पैसे घेऊन पक्षविरोधी काम करून कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचे पाप हे लोक करत आहेत. आता आम्हाला न्याय कोण देणार? पार्थदादा आणि वहिनी तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. त्यामुळे पार्थदादा आता आम्ही तुम्हाला अजितदादांच्या रूपात बघत आहोत. आता तुम्हीच दादांसारखंच आम्हाला न्याय द्यावा ही विनंती, असेही या पोस्टरमध्ये म्हटलं आहे.
FAQs :
1. पुण्यात स्वीकृत नगरसेवक पदाचा वाद का सुरू आहे?
दहा जागांसाठी तब्बल 400 इच्छुक असल्यामुळे उमेदवारीवरून राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
2. चेतन तुपे यांच्या विरोधात बॅनर कुठे लागले?
पुण्यातील हडपसर परिसरात त्यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले आहेत.
3. बॅनरमध्ये कोणते आरोप करण्यात आले आहेत?
निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आमदार आपल्या मुलासाठी पद मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे.
4. या वादाचा कोणत्या पक्षाशी संबंध आहे?
हा वाद मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजीशी संबंधित आहे.
5. स्वीकृत नगरसेवक पदासाठी किती जण इच्छुक आहेत?
या पदासाठी जवळपास 400 जण इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.