PMC News: स्वीकृतच्या एका जागेसाठी घोडेबाजार? कोटीच्या कोटी उड्डाणे; थेट दिल्लीपर्यंत पदाधिकाऱ्यांची धाव

Pune Municipal Corporation nominated corporator election: एका जागेसाठी काही कोटी रुपये मोजण्यास तयार असल्याचा देखील सांगितलं जात आहे. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट काँग्रेस श्रेष्ठींकडे पत्राद्वारे तक्रार केली असल्याचं समोर आले आहे.
PMC Nominated Corporator election
PMC Nominated Corporator electionSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 6 march 2026 : सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या उमेदवारीवरून घमासान सुरू आहे. पुण्यातून दहा स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार भाजप सर्वाधिक सात स्वीकृत नगरसेवक निवडणार आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीला दोन आणि काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहे.

सध्या भाजपामध्ये त्या सात जागांसाठी तब्बल 300 जण इच्छुक असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे कोणाची निवड करावी याबाबत वरिष्ठासमोर मोठी डोकेदुखी ठरत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये देखील आमदार आपल्या मुलासाठी स्वीकृत नगरसेवक मिळावं, यासाठी प्रयत्न करत असल्याबाबत नाराजी व्यक्त करणारे पोस्टर हडपसर भागामध्ये लागल्याच्या पाहायला मिळाले.

हे सर्व सुरू असताना आता काँग्रेसमधून एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. काँग्रेसच्या एका जागेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या एका जागेसाठी काही कोटी रुपये मोजण्यास तयार असल्याचा देखील सांगितलं जात आहे. या सर्व सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे व्यतीत झालेल्या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट काँग्रेस श्रेष्ठींकडे पत्राद्वारे तक्रार केली असल्याचं समोर आले आहे.

PMC Nominated Corporator election
BJP Politics: भाजपनं भाकरी फिरवली; तरुण नेतृत्वाकडे सूत्रे; मावळात मोठे संघटनात्मक फेरबदल

कार्यकर्त्यांमध्ये असंतोष

या पत्रामध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचा सांगत पक्षाशी निष्ठावान नसलेल्या, संघटनेत योगदान न देणाऱ्या आणि इतर पक्षांची उमेदवारी मिळवणाऱ्या व्यक्तीला नियुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे शहरातील कार्यकर्त्यांना पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे.

PMC Nominated Corporator election
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंचा आदेश! सरकारने 316 अधिकाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता; दोन वर्षांपर्यंत कारावास...

कोण बाजी मारणार

या प्रकाराची तत्काळ दखल घेत हा घोडेबाजार थांबवावा आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्यावा असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आला आहे. दोन दिवसांमध्ये काँग्रेसच्या एका स्वीकृत जागेसाठी निर्णय होणार आहे. त्यापूर्वीच केंद्रातील पक्ष श्रेष्ठींना झालेल्या या पत्रव्यवहारानंतर काँग्रेस नेमकी कोणाची निवड स्वीकृतपदी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com