BMC Swikrut Nagarsevak : बीएमसीत ‘इनसाइड पॉलिटिक्स’चा स्फोट! शिंदेंविरुद्ध अजितदादा राष्ट्रवादी; मलिक कनेक्शनने राजकारण तापलं

Shivsena-NCP Politics : स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागांसाठी सुरू असलेल्या या लॉबिंगमुळे शिवसेनेत अंतर्गत हालचालींना वेग आला असतानाच राष्ट्रवादीनं शिंदेंना खिंडीत गाठल्याची माहिती समोर येत आहे.
Eknath Shinde Sena
Eknath Shinde SenaSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मुंबई महानगरपालिकेमधील स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीवरून महायुतीमध्ये पडद्यामागे हालचाली वेगाने सुरू आहेत.

  2. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने दावा ठोकल्याची चर्चा आहे.

  3. नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांच्या नावामुळे महायुतीत नवा पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना आघाडीची सत्ता आली असून आघाडीचा महापौरही झाला आहे. आता विविध समित्या आणि स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार लॉबिंग पाहायला मिळत असून पडद्यामागून हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आल्याने येथे शिवसेनेचे दोन स्वीकृत नगरसेवक होतील.

यासाठी नावे निश्चित करण्यात आली असून एका पदासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांचा त्यांच्या मुलाचे नाव आणि बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चांना उत आलं असतानाच आता राष्ट्रवादीनं शिंदेंना खिंडीत गाठल्याची रणनीती आखल्याचे समोर येत आहे. येथे एका जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. यामुळे आता शिंदेंसमोर मोठा पेच निर्माण झाला असून मलिक कनेक्शन समोर आल्याने राजकारण तापलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला काठावरचं बहुमत मिळाले. यामुळे आपले संख्याबळ वाढवण्यासाठी भाजप-शिंदेंच्या शिवसेनेनं तीन नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेतले. सोबत येण्यासाठी आधी गळ घातली आणि त्यांचा पाठिंबा पदरात पाडून घेतला. मात्र आता हाच पाठिंबा शिंदेंची अडचण ठरताना दिसत आहे.

Eknath Shinde Sena
NCP Vs Shivsena Politics : स्थानिक निवडणुकांपूर्वी तटकरेंचा मास्टर स्ट्रोक! गोगावले-थोरवेंच्या मतदारसंघातच उतरवले कट्टर विरोधक

मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीवरून महायुतीमध्येच जोरदार रस्सीखेंच होताना दिसत आहे. तर येथे जोरदार हालचाली सुरू झाल्याही आहे. शिंदेंच्या शिवसेनेत दोन जागांसाठी एकीकडे लॉबिंग होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर दावा ठोकला आहे. एका जागेसाठी राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचे नाव समोर येत आहे. या नावामुळे आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेत सध्या स्वीकृत नगरसेवकांच्या जागा भरण्याच्या हालचालींना वेग आला असून महायुतीमधील जागावाटपाच्या सूत्रानुसार, शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा गेल्या आहेत. यातीलच एका जागेवर 'सहयोगी पक्ष' म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका मांडत दावा केला आहे. तसेच एका जागेची मागणी करत आम्हाला ती मिळावी, अशी मागणी लावून धरली आहे.

दरम्यान स्वीकृत नगरसेवकाच्या एका जागेवर दावा करताना राष्ट्रवादीने नवाब मलिक याचे बंधू तथा माजी नगरसेवक कप्तान मलिक यांचे पुढे केले आहे. पण या नावाला भाजपकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तरीही आम्ही महायुतीत सहयोगी असून आमच्या प्रतिनिधीला संधी मिळणे गरजेचं असल्याचे राष्ट्रवादीने म्हटल्याचे कळत आहे.

Eknath Shinde Sena
Shivsena Vs Ncp : युतीसाठी धावाधाव करणाऱ्या गोगावलेंना तटकरेंकडून चेकमेट! भाजपकडून निर्णय जाहीर, फडणवीसांची भेट वाया

FAQs :

1. स्वीकृत नगरसेवक पदांवरून वाद का निर्माण झाला आहे?
जागावाटप आणि उमेदवारीवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद झाल्याची चर्चा आहे.

2. कोणत्या पक्षाने दावा ठोकला आहे?
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या वाट्याच्या जागेवर दावा केल्याचे समोर आले आहे.

3. या प्रकरणात कप्तान मलिक यांचे नाव का चर्चेत आहे?
त्यांना स्वीकृत नगरसेवक करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

4. याचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
या वादामुळे आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता असून राजकीय समीकरणे बदलू शकतात.

5. अंतिम निर्णय कधी होणार?
पक्षांमधील चर्चेनंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com