Pune News : पुण्यात प्रस्तावित असणाऱ्या पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील एकूण 2700 हेक्टर जमीन भूसंपादन केले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून शेतकऱ्यांसमवेत संवाद साधला जात आहे. पण वनपुरी, एखतपूर, उदाचीवाडी, कुंभारवळण, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांत बाधित शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून जमीन पाहिजे तर एकरी दहा कोटींचा मोबदला द्या, अशी मागणी केली आहे. तर या मागणीसाठी सात गावांमधील दहा ते बारा शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेटही घेतल्याचे समोर आले असून त्यांनी चर्चाही केली आहे.
पुरंदर विमानतळासाठी करण्यात येणार्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी राज्य सरकारने हालचाली गतीने सुरू केल्या आहेत. तर विमानतळासाठी पुढील सहा महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. पण आता शेतकऱ्यांनी नवी मागणी केल्याने पेच निर्माण होण्याची शक्यात आहे. मात्र जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी यात कोणतीच अडचण येणार नसून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान प्रस्तावित विमानतळासाठी सात गावांमधून सुमारे 2 हजार 673 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या निर्णयाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध झाला होता. तसेच आंदोलनाच्या माध्यमातून सर्व्हेक्षणही थांबवण्यात आले होते.
पण आता भूसंपादनातील विरोध कमी झाला असून बाधित शेतकऱ्यांच्या एका गटाने जिल्हाधिकारी डूडी यांची भेट घेऊन मोबदल्याबाबत चर्चा केली आहे. त्यांनी एकरी दहा कोटी रुपये तसेच संपादित जमिनीच्या 15 टक्के जमीन परतावा म्हणून मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी भूसंपादन कायद्यानुसार जे देय आहे. ते देण्यात येईल असे शब्द जिल्हाधिकाऱ्यांनी डूडी यांनी यावेळी शेतकऱ्यांना देताना त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान तालुक्यातील पारगाव कुंभारवळण, वनपुरी, एखतपुर, उदाची वाडी, मुंजवडी आणि खानावडी या सातही ग्रामपंचायतींनी केलेल्या ठरावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यावेळी निवेदनानुसार बेघर होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकूण जमिनीच्या 15 टक्के जमीन देण्याच्या मागणीबाबत सकारात्मक दृष्टीने विचार करून तसा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.