Purandar Airport : पुरंदरमधील 7 गावांत चर्चा, ताईंच्या नावावर 135 एकर जमीन? सुप्रिया सुळेंनी दिलं चॅलेंज

Supriya Sule's Stand on the Issue : सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये भूसंपादनावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली.
Villagers protesting against the Purandar Airport land acquisition.
Villagers protesting against the Purandar Airport land acquisition. Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुरंदर विमानतळाला जागा देण्यास सात गावांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमची जागा देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली असून प्रशासनाकडून मात्र ड्रोन मार्फत सर्व्हे करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष वाढला आहे. अशातच स्थानिक शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर शंका उपस्थित केली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी देखील उत्तर दिलं आहे.

सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये भूसंपादनावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांची विमानतळ होत असलेल्या परिसरामधील दोन गावांमध्ये 130 ते 135 एकर जमीन असल्याची शंका उपस्थित केली. सात गावांमध्ये हीच चर्चा असल्याचं देखील शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं.

Villagers protesting against the Purandar Airport land acquisition.
Mock Drill in Maharashtra : आत्ताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉक ड्रील; वाचा संपूर्ण यादी...

यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी ऑन रेकॉर्ड तुम्हाला चॅलेंज करते की, पुरंदर तालुक्यामध्ये एक इंच जरी जागा माझ्या नावावर असेल, तर ती मी तुमच्या नावावर करायला तयार आहे. तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा. त्याठिकाणी सातबारा चेक करा, ज्या सातबारावर माझं नाव असेल, तर मी प्रत्येकाला माझ्या नावावर असलेल्या जमिनीमधून प्रत्येकी एक एकर गिफ्ट म्हणून द्यायला तयार असल्याचा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला.

पुरंदरमध्ये सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, शरद पवार, प्रतिभा पवार, रेवती सुळे या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे पुरंदर मध्ये एकही इंच जमीन नाही. तुम्ही तलाठ्याच्या ऑफिस मध्ये जाऊन पुरंदरचा नकाशा काढून अभ्यास  करा. त्यामध्ये कुठेही जमीन आढळली तर मला सांगा, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Villagers protesting against the Purandar Airport land acquisition.
Home Ministry decision : शेतकऱ्यांबाबत राज्याच्या गृह विभागाने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय ; क्षेत्रीय पोलिस अधिकाऱ्यांनाही सूचना

दरम्यान, सरकारकडून विमानतळाच्या जागेचा करण्यात येणारा सर्व्हे थांबविण्यात आला आहे. तसेच गावकऱ्यांशी बैठक करून गावकऱ्यांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त मोबदला देता येईल, याबाबत आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. पुढील सात दिवसांत शेतकऱ्यांनी आपल्या अपेक्षा सांगाव्यात, असं देखील सरकारकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आला आहे. तरी देखील शेतकरी आपली जमीन न देण्यावर ठाम असून सध्या या शेतकऱ्यांना भेटायला विरोधी पक्षातील नेते येताना पाहायला मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com