Rahul Gandhi  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rahul Gandhi : भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधींनी मागितली माफी, म्हणाले,'शिवाजी महाराजांची मूर्ती...'

Rahul Gandhi Kolhapur Tour Inauguration of statue of Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फक्त मूर्ती नाही. मूर्ती जेव्हा बनवली जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या विचारधारेचे आपण समर्थन करत असतो, असे राहुल गांधी म्हणाले

Roshan More

Rahul Gandhi News : राहुल गांधी आज (शनिवारी) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी भाषण करण्यासाठी राहुल गांधी उभे राहिला असता त्यांनी आपला भाषणाच्या सुरुवातीलाच कोल्हापुरकरांची माफी मागितली.

राहुल गांधी म्हणाले, मी कालच संध्याकाळी येणार होतो. मात्र, विमानात तांत्रिक अडचण आली त्यामुळे येता आले नाही. कार्यक्रम रद्द झाल्याने तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो.

छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फक्त मूर्ती नाही. मूर्ती जेव्हा बनवली जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या विचारधारेचे आपण समर्थन करत असतो. ज्यांची मूर्ती आहे ते ज्या विचारधारेसाठी लढले आपण त्यासाठी लढलो नाही तर मूर्तीला महत्त्व नाही. पूर्णपणे आपण त्यांच्यासारखे बनू शकत नाही. पण थोडेफार तरी तसे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

शिवाजी महाराजांच्या विचाराचे आजचे सर्वोत्तम प्रतिक काय असेल, असे म्हणत राहुल गांधींनी संविधानाची प्रत दाखवली. शिवाजी महाराजांच्या विचाराने संविधानामध्ये आहे. त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांनी कोणीावरही अन्याय केला नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

मालवणमध्ये शिवाजी महारांचा पुतळा कोसळला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले होते. त्यावरून मोदींचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, त्यांनी उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ज्या विचारधारेने तो उभारला होता. ती विचारधारा शिवाजी महाराजांना मान्य नव्हती. तुम्ही पुतळ्यासमोर हात जोडत असाल तर तुम्हाला संविधानाचे रक्षण करावे लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT