Poster in Karveer Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rahul Patil : साहेबांच्या माघारी आता 'राहुल'ची जबाबदारी; पी. एन. पाटलांचे चिरंजीव लागले कामाला ?

Rahul Gadkar

Kolhapur Political News : करवीरचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर जिल्हा काँग्रेस सह करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पोकळी निर्माण झाली होती. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचे नुकसान झालेच, शिवाय एकनिष्ठ आणि प्रामाणिक नेत्याला जनता मुकली आहे.

पी. एन पाटील यांचा पुढील राजकीय वारसदार कोण, याबाबत मेळावा झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व हाती घेतले आहे.

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने त्यांनी करवीरच्या मैदानात शड्डू ठोकला आहे. त्यांनी संपर्क दौऱ्याला सुरुवात केली असून जवळपास 30 ते 35 पेक्षा अधिक गावात संपर्क करून अप्रत्यक्षपणे प्रचार शुभारंभ केला आहे.

राहुल पाटील Rahul Patil यांनी मंगळवार दिनांक 2 जुलैपासून करवीर विधानसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार म्हणून निवडणुकीच्या अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्यांनी सादळे, मादळे, शिये, जठारवाडी, भुये, भुयेवाडी, पडवळवाडी केर्ले, केर्ली, सोनतळी, निगवे, रजपुतवाडी या गावांसह पन्हाळा तालुक्यातील जवळपास 16 ते 17 गावांमध्ये संवाद साधला आहे.

आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर राहुल पाटील यांनी राजकीय वारसदार म्हणून पुढे येत असताना मतदार आणि नागरिकांकडून त्यांचं विशेष स्वागत आणि सांत्वन करण्यात येत आहे. नागरिकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून करवीरमधील भेडसावत असलेल्या प्रश्नांची माहितीही लोक राहुल पाटील यांना देत आहेत.

कार्यकर्त्यांकडून निष्ठेची शपथ

आमदार पी. एन. पाटील P. N. Patil यांचे नेतृत्वाची भुरळ ज्येष्ठांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत होती. एकावेळी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून त्यांनी जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्या निधनानंतर करवीरनगरीची जनता पोरकी झाली.

गांधी घराणे, काँग्रेसवरची निष्ठा आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम आमदार पी. एन. पाटील यांनी कधी ढळू दिले नाही. कार्यकर्त्यांनी मागे सावलीप्रमाणे राहणाऱ्या पी. एन. पाटील यांच्या माघारी त्यांच्या मुलांना आधार देणे गरजेचे आहे, अशी भावना लोकांत आहेत.

आमदार पाटील यांच्या माघारी आता आपली जबाबदारी म्हणत आगामी राजकारण आणि सामाजिकरणात त्यांच्या मुलांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार आणि निष्ठेची शपथ घेतली होती.

दरम्यान, राहुल पाटील 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले, हा संपर्क दौरा कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला नाही. पी. एन. साहेबांचे निधन झाल्यानंतर समस्त जनता माझ्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी आली होती. त्यांचे आभार मानण्यासाठी मी जनतेच्या दारात जात आहे. कोणत्याही निवडणुकीचा प्रचार शुभारंभ अजून मी केलेला नाही, असे मत व्यक्त केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT