Ajit Pawar News : अजितदादांना पिंपरीत दुसरा धक्का ? अण्णा बनसोडे म्हणतात,' मला अनेक बड्या नेत्यांचे फोन; पण...

NCP Ajit Pawar group MLA Anna Bansode Big Statement : महायुतीत विधानसभेसाठीचा जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेली नाही. पण पिंपरीची जागा ही महायुतीत...
Ajit Pawar and Anna Bansode
Sarkarnama Ajit Pawar and Anna Bansode
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय समीकरणंच पलटवली आहे. निवडणुकीआधी सुसाट असलेल्या महायुतीच्या ट्रिपल इंजिनाकडे पाठ फिरवत आता महाविकास आघाडीकडे इच्छुकांचा ओढा वाढला आहे. दिवसेंदिवस इच्छुकांकडून मविआच्या नेत्यांच्या भेटीगाठींसाठी रांगेत आहेत. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीतील इनकमिंग वाढण्याची शक्यता आहे.

यात भाजपसह शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील इच्छुकांनी आत्तापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी आपली जागा 'सेफ' करण्याच्या हेतूने तयारी सुरू केली आहे. अशातच पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनीही सूचक विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षांसह 16 माजी नगरसेवकांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली होती. यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आता पिंपरीचे आमदार आणि अजित पवारांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेल्या बनसोडे यांनी मोठं विधान केलं आहे.

आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक पक्ष, नेत्यांचे फोन येत असा दावा केला आहे. त्यामुळे बनसोडे यांना पक्षात आणून महाविकास आघाडीतील कोणता पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहे यावरुन तर्क-वितर्कांना लढवले जात आहेत.

Ajit Pawar and Anna Bansode
NCP Sharad Pawar : शरद पवारांकडून झिरवळांच्या नावावर फुली? दिंडोरीत देणार नवा चेहरा?

महायुतीत विधानसभेसाठीचा जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण पिंपरीची जागा ही महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाला सुटण्याची शक्यता आहे.कारण याठिकाणी भाजप किंवा शिवसेना शिंदे गट सध्यातरी या जागेवर दावा ठोकण्याच्या मानसिकतेत दिसून येत नाही.तसेच भाजपने येथील अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी देत पिंपरीतली डोकेदुखी करण्याचा प्रयत्न केला आहे.

अण्णा बनसोडे काय म्हणाले...?

अण्णा बनसोडे यांनी मला इतर पक्षातून संपर्क साधला जात असून,बड्या नेत्यांचे फोनही येत असल्याचं खळबळजनक विधान केलं आहे.पण त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची हे मी ठरवेन आणि माझं ठरलं असल्याचं सांगत आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.

Ajit Pawar and Anna Bansode
Maratha Vs OBC : मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा पेटणार! 'आम्हीच शांत का बसावं', मनोज जरांगे पाटलांचा इशारा

यावेळी त्यांनी यावेळी आपण अजित पवारांचे कट्टर समर्थक असल्याचं ठणकावून सांगितले आहे. ते म्हणाले,माझं ठरलं आहे की,कुठल्या पक्षाकडून लढायचे. पिंपरी या मतदारसंघात काम करताना प्रत्येकाचे फोन मला येतात.मात्र, जो निर्णय घ्यायचा आहे तो मी घेणारच आहे. पण आपण अजितदादांच्या राष्ट्रवादी आणि घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगत इतर पक्षांच्या ऑफरवरुन उठलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com