Rahul Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar: अजितदादांचा कोल्हापूरमध्ये मोठा धमाका; काँग्रेससोबत 40 वर्षे एकनिष्ठ राहिलेल्या कुटुंबातील बड्या नेत्यालाच फोडलं

NCP Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर राहुल पाटील हे महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.

Deepak Kulkarni

Kolhapur News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महायुतीत इन्कमिंग सुसाट सुरू आहे. विरोधी पक्षातील काठावरच्या नेत्यांना पक्षात आणत स्थानिकच्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी महायुतीतील भाजप ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह शिवसेनेनं सुरू केल्याचं दिसून येत आहे. याचदरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी मोठा धक्का दिला आहे.

दिवंगत आमदार पी.एन पाटील यांचे पुत्र आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील (Rahul Patil) यांनी सोमवारी (ता.25) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे कोल्हापुरात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली खालसा येथे आयोजित मेळाव्यात अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर राहुल पाटील हे महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.त्यांनी अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

यावेळी राहुल पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आज वडिलांची आठवण येतेय.याच जागेवर पी. एन पाटीलसाहेबांना 14 महिन्यांपूर्वी निरोप दिला. 40 वर्षे जिल्हा बँकेचे संचालक आणि 5 वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून काम केल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

तसेच पी एन पाटीलसाहेबांनी काँग्रेसचे काम आयुष्यभर काम केले, ते कार्यकर्त्यांसाठी झटले. विलासराव देशमुख यांच्यावर त्यांनी कायमच निष्ठा ठेवली. त्यांच्या पश्चात माझ्यावर जबाबदारी आली. पण आताही जनता त्याच प्रेमानं आणि त्याच ताकदीनं माझ्यासोबत राहील असा विश्वासही व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला जी माणसे वाटतं होती. तीच लोकं पी.एनसाहेबांच्या जाण्यानंतर लांब गेली. त्या लोकांना सांत्वन करायलाही वेळ मिळाला नाही. पण माझी आई आणि बाबा गेल्यानंतर अजितदादा तुम्ही येऊन धीर दिला. पण यापुढे पाटील आणि पवार कुटुंबाचं नात घट्ट करणार असल्याची ग्वाहीही काँग्रेसवर हल्लाबोल करताना दिली.

पी एन पाटील साहेबांनी ज्या निष्ठेने काम केले. त्याच पद्धतीने राष्ट्रवादीसोबत प्रामाणिक राहणार आहे. अजितदादांनी उद्याच्या काळात आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात ठेवावा अशी अपेक्षाही राहुल पाटील यांनी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT