Rajan Patil & opponent Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohol Assembly Election : राजन पाटील विरोधकांची एकी विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवणार?

Assembly Election 2024 : शिवसेना पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय नेते अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. त्या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेर सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण निवळण्यासाठी मदत झाली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 01 August : अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी झाली. हे अप्पर तहसील कार्यालय अनगरला करण्यावरून आमदार यशवंत माने आणि राजन पाटील यांच्यावर टीकेची झोड उडवण्यात आली.

अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून पाटील विरोधकांची बांधलेली मोळी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहून चमत्कार घडवेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोहोळच्या तहसील कार्यालयाचे विभाजन करून अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. हे तहसील कार्यालय अनगरला मंजूर करण्यात आल्याने राजन पाटील (Rajan Patil) यांच्या विरोधकांनी एकत्र येत सर्वपक्षीय आघाडी उभारली. मोहोळ बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. तसेच आमदार यशवंत माने (Yashwant Mane) आणि राजन पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. त्यामुळे मोहोळचे राजकीय वातावरण तापले होते.

विरोधकांना उत्तर देण्यासाठी राजन पाटील समर्थकांनीही बैठक बोलावली होती. त्या बैठकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने अनगरला अप्पर तहसील कार्यालय उभारण्यास आमचा विरोध असल्याचे सांगून उमेश पाटील यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असल्याचे विधान केले होते. त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला.

शिवसेना पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय नेते अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. त्या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेरसर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण निवळण्यासाठी मदत झाली आहे. मात्र, अनगरचे अप्पर तहसील कार्यालय अद्यापही रद्द झालेले नाही.

अनगर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून मोहोळ तालुक्यातील राजन पाटील यांच्या विरोधातील सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. एरव्ही वेगवेगळे लढणारे हे नेते प्रथमच पाटील यांच्याविरोधात एकत्र आले होते. ह्या सर्वपक्षीय ऐकीचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ही विरोधकांची एकी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का, हा खरा सवाल आहे.

मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांच्या कट्टर विरोधकांची भूमिका त्यांच्याच पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील बजावत आहेत. त्यांना पेनूरचे माजी उपसभापती मानाजी माने यांची खंबीर साथ आहे. त्यांना शिवसेनेचे ठाकरे गटाचे दीपक गायकवाड, सीमा पाटील, शरद पवार गटाचे संजय क्षीरसागर, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, शेटफळचे विजयराज डोंगरे, शिवसेना शिंदे गटाचे चरणराज चवरे आदींनी भरभक्कम साथ दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT