Solapur Politics : राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा; महेश कोठेंची कोंडी होण्याचा अंदाज

Mahavikas Aghadi : आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या सोलापूर शहर उत्तर मतदार संघावर काँग्रेसने आज अधिकृतपणे दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते माजी महापौर महेश कोठे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू झाल्याचे मानले जात आहे.
Sunil Rsale
Sunil RsaleSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 August : विधानसभा निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा कालावधी असतानाच महाविकास आघाडीत आतापासूनच राजकीय कुरघोडीला सुरुवात झाली आहे.

आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या सोलापूर शहर उत्तर मतदार संघावर काँग्रेसने आज अधिकृतपणे दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू झाल्याचे मानले जात आहे.

महेश कोठे (Mahesh Kote) इच्छुक असलेल्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून (Solapur City North constituency) काँग्रेसकडून सुनील रसाळे यांनी उमेदवारी मागणीचा अर्ज काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे आज दाखल केला आहे. विशेष म्हणजे रसाळ हे एकेकाळी कोठे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. आता त्यांच्याकडूनच कोठे इच्छुक असलेल्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केल्याने आघाडीतही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात सध्या भाजपचे विजयकुमार देशमुख हे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना तब्बल 35000 मतांची आघाडी मिळवून दिली होते. त्यानंतरही या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून (Congress) मोठ्या संख्येने इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

महेश कोठे यांनी या मतदारसंघातून 2009 मध्ये विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यावेळी कोठे यांचा 10 हजार मतांनी पराभव झाला होता, त्यानंतर महेश कोठे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्या दोन्ही निवडणुकीत कोठे यांचा पराभव झाल्याने त्यांचे आमदारकीचे स्वप्न अद्यापही पूर्ण झालेले नाही.

Sunil Rsale
Assembly Election 2024 : माने, मिस्त्रीनंतर हसापुरे, कोंगनुरेंचाही काँग्रेस उमेदवारीवर दावा; उमेदवारीचा फैसला शिंदेंच्या हाती!

आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेसमधून शिवसेना, शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केलेल्या महेश कोठे यांच्यापुढे पुन्हा काँग्रेसच्या इच्छुकांचे अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक, दोन्ही काँग्रेसच्या आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला गेलेला आहे.

या मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आल्यामुळे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली होती. आता त्यानंतर या मतदारसंघातून एकेकाळी कोठे यांचे समर्थक असणारे सुनील रसाळे यांनीच उमेदवारी मागणीचा अर्ज काँग्रेसकडे दाखल केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Sunil Rsale
Chandrakant Gudewar : माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवारांना सोलापुरातून व्हायचंय आमदार; फडणवीसांना साकडे

महाविकास आघाडीत तीनही पक्षाला कुठल्या जागा मिळणार, याची निश्चिती झाली नसतानाच उमेदवारी मागणीचे अर्जाद्वारे काँग्रेसकडून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघावर दावा केला जात आहे. रसाळे यांच्या मागणीवर आता काँग्रेस पक्षाकडून कोणता निर्णय होतो आणि महेश कोठे यांच्यासह महाविकास आघाडीची भूमिका काय असणार, याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com