Kolhapur News : दोन दिवसांपुर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या चिरंजीवाचा गोव्यातील कॅसिनोतील व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हायरल व्हिडीओनंतर कोल्हापुरातील शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाद चांगलाच उफाळून आला आहे.
ऋतुराज क्षीरसागर हे दहा-बारा दिवसांपूर्वी गाेव्यातील एका कॅसिनोमध्ये गेले होते. त्यावेळी कोल्हापुरातीलच काही कार्यकर्त्यांनी त्यांचा व्हिडीओ तयार केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र त्याला प्रत्युत्तर न देता क्षीरसागर यांनी आपल्या पर्सनल व्हाट्सऍप नंबर वरून, ' एका वाघावर काही कुत्रे भुंकत असतानाचा' व्हिडिओ स्टेटस ठेवला होता. या स्टेटसमध्ये 'वाघाने कुत्र्याला फाडले' असे दाखवण्यात आले होते.
व्हाट्सऍपवर रंगले 'स्टेटस' युद्ध
याला प्रत्युत्तर म्हणून जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी देखील त्याच पद्धतीचा स्टेटस आपल्या व्हाट्सऍपवर ठेवला होता. शिवाय क्षीरसागर आणि इंगवले असा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये करण्यात आला होता. आता मात्र, या दोन्ही विरोधकांमध्ये सुरू असलेल्या स्टेटस वॉरची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात रंगली आहे.
व्यक्तिगत चिखलफेक कितपत योग्य?
दरम्यान, राजकीय जीवनात प्रत्येकाने व्यक्तिगत आयुष्यात आपण काय करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे या व्हिडिओनंतर व्यक्तिगत पातळीवर टीका करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न समाज माध्यमातून उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.