Maharashtra Politics Live Update : विजय पाटकर यांच्यावर मेघराज भोसले यांचा पलटवार; 'माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा...'

Maharashtra Breaking News Today LIVE 24 May अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’ परिसरात शनिवारी भीषण गोळीबाराची घटना घडली आहे, यासह राज्य आणि देशभरातली महत्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

Election Chitrapat Mahamandal : विजय पाटकर यांच्यावर मेघराज भोसले यांचा पलटवार; 'माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा...'

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेते विजय पाटकरविरुद्ध मेघराज भोसले अशी लढत दिसून येणार असल्याची सर्वत्र चर्चा होती. मात्र, या वेळी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू असताना मला निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरू दिला नसल्याचं विजय पाटकर यांनी म्हटलं आहे. या आरोपावर विरोधी उमेदवार मेघराज भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय पाटकर यांनी माझ्यावर आज अनेक आरोप लावले, अभिनेता म्हणून हा माणूस चांगला आहे, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा आहे हे त्यांनी आज दाखवून दिलं, असे म्हणत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज भोसले यांनी विजय पाटकर यांच्या आरोपावर स्पष्टीकरण देत पलटवार केला.

Fuel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरांमध्ये आणखी वाढ होणार, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा इशारा

पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये आणखी वाढ होईल, असा इशारा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक राज कुमार दुबे यांनी दिला. सध्याची परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास इंधन दरवाढ टाळणे कठीण होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दुबे यांनी तीन पर्याय मांडले असून पहिला म्हणजे पेट्रोल पंपांवरील इंधनाचे दर वाढवणे, दुसरा म्हणजे तेल कंपन्यांनी तोटा सहन करत राहणे आणि तिसरा पर्याय म्हणजे सरकारने कंपन्यांच्या नुकसानीची आर्थिक भरपाई करणे.

Akola News : गॅसशिवाय 1800 विद्यार्थ्यांसाठी अन्न; प्रभात स्कूल कम्युनिटी किचनचं देशभर होतंय कौतुक

शाश्वत ऊर्जा वापराचा नवा आदर्श निर्माण करत, अकोला इथल्या प्रभात-डे बोर्डिंग शाळेने एक अभिनव उपक्रम राबवला आहे. Prabhat School Community Kitchen येथे दररोज सुमारे 1800 विद्यार्थ्यांसाठी अन्न तयार केले जाते, तेही कोणताही गॅस किंवा लाकूड न वापरता. हा उपक्रम पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपाययोजनांचा उत्तम उदाहरण ठरत आहे. नीरज आवंडेकर (संचालक), डॉ. गजानन नारे (प्रभात किड्स स्कूल संचालक) आणि कर्मचारी पूनम वारसकर यांनी माहिती दिली. हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात ऊर्जा बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा नवा आदर्श निर्माण करत आहे.

BEED Crime : बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून विवाहित महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले...

बीड जिल्ह्यातील एका राजकीय पुढाऱ्याच्या मुलाने विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बीड शहरातील चऱ्हाटा रोड भागात राहणाऱ्या आणि हल्ली शहादा जिल्हा नंदुरबार इथं वास्तव्यास असलेल्या महिलेवर अमर बांगरने वारंवार बळजबरी केली. तसेच, तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे. या घटनेनं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Sangali Rain : सांगली वाळवाच्या पावसाचा जोरदार तडाखा; आटपाडी तालुक्यात गारा बरसल्या.....

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यांमध्ये सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. झाड पडून एका म्हशीचा मृत्यू देखील झालेला आहे. सखल भागात पाणीच पाणी साचले आहे. या पावसामुळे डाळिंब पिकाचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

Gadchiroli Update : गडचिरोलीतील चामोर्शी इथल्या लाकूड डेपोला भीषण आग; लाखो रुपयांचे सागवान जळून खाक

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आलापल्ली वन विभागांतर्गत येणाऱ्या घोट येतील लाकूड डेपोला आज भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत डेपोमधील लाखो रुपयांचे सागवान लाकूड जळून भस्मसात झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Yashomati Thakur : विजय पाटकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखले

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. एका मंत्र्याचा OSD कोल्हापुरात बसून ही निवडणूक मॅनेज करत आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून बिनविरोध निवडणुका करणे ही अत्यंत घातक प्रवृत्ती हल्ली वाढली आहे, असे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

संसदरत्न खासदारांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदरत्न खासदारांचे अभिनंदन केले. भाजपा खासदार डॉ. हेमंत सवरा, खासदार मेधा कुलकर्णी, खासदार स्मिता वाघ यांच्यासोबतच भाजपा महायुतीतील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांची ‘संसद रत्न’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी मांडणी आणि संसदीय कामकाजातील उल्लेखनीय योगदानाची ही दखल निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

लॉजिस्टिक्स पार्क नागपूरच्या आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड

नागपूर व गडचिरोली भागातही आता उद्योग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. त्यामुळे लॉजिस्टीक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. गोदाम लॉजिस्टिक्स पार्क हा नागपूरच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Ambadas Danve : किमान पुस्तकांची प्रस्तावना तरी वाचायला हवी होती

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “संजय गायकवाड फक्त पुस्तकाचं कव्हर पाहतात, पण आत काय लिहिलं आहे हे ना वाचतात ना समजून घेतात. फक्त कव्हर पेज पाहून प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे.” दानवे यांनी पुढे सांगितलं की, “गायकवाड यांनी किमान पुस्तकांची प्रस्तावना तरी वाचायला हवी होती. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या पुस्तकांमधून कोणते विचार मांडले आहेत, हे त्यांना माहितीच नाही.” अशा शब्दांत त्यांनी गायकवाड यांच्या भूमिकेवर निशाणा साधला.

udyanraje bhosle :पालिकेच्या कामात कुठलाही सावळागोंधळ खपवून घेतला जाणार नाही

सातारा नगरपालिकेतील नगरसेवकांची रविवारी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची आणि हायव्होल्टेज बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून पालिकेतील दोन्ही राजेंच्या गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद धुमसत होता. याच वादाची गंभीर दखल घेत आज दोन्ही राजेंनी नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. यावेळी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. पालिकेच्या कामात कुठलाही सावळागोंधळ खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा यावेळी त्यांनी दिला.

शिवराज मोटेगावकर याच्या संपत्तीची चौकशी सुरू; पुणे लातूरसह अनेक शहरात मोटेगावकरची इस्टेट

नीट पेपर फुटीप्रकरणी अटकेत असलेला शिवराज मोटेगावकर याच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे पुढे आले आहे. ही संपत्ती खरेदी करण्यासाठी पैसा कोठून आला, याची तपास ईडी करत आहे. राज्यातील अनेक शहरात मोटेगावकर यांची संपत्ती असल्याचे पुढे आले आहे. यात पुणे, लातूरसह अनेक ठिकाणी जमिनी आणि इमारती खरेदी केल्याचे पुढे आले आहे.

मध्य रेल्वेची लोकल सेवा गेली चार तासांपासून खंडीत

वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे मध्य रेल्वे विभागाची वाहतूक गेली चार तासांपासून खंडीत झाली आहे. कसारा ते कल्याण मार्गाावर हा वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. आसनगाव ते खडवली दरम्यान वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. पहाटेच्या वेळी वीजपुरठ्यात बिघाड झाला आहे, त्यातून हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे.

Girish Mahajan : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी रात्री तातडीने दिल्लीला रवाना झाले. विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत ते दिल्लीला गेलेत का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण त्यांच्या या दौऱ्यामुळे राज्यात चर्चेंना उधाण आले. तर त्यांच्या पाठोपाठ आज भाजपचे मंत्री गिरीश महाजन दिल्लीकडे रवाना होणार आहे. राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिंदेंच्या पाठोपाठ भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन दिल्लीकडे दिल्लीकडे रवाना होत आहेत.

नरेंद्र मोदींच्या आवाहनाला खासदार श्रीकांत शिंदेंकडून हरताळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. शहापूर येथील कार्यक्रमाला खासदार शिंदे यांच्यासोबत कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा आला होता. त्या शिंदेंसोबत मोठ्या प्रमाणात गाड्या आल्या होत्या.

डिझेल वाटपासाठी पंपचालकाची अनोखी शक्कल; सर्वांना मिळतंय डिझेल

बुलाडाण्यात डिझेलवरून होणाऱ्या वादाच्या घटना टाळण्यासाठी पंपचालकाने अनोखी शक्कल लढवली आहे. पंपवार येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाला कुपन दिले जाते, ते कुपन दाखवल्यावरच डिझेल दिले जाते. दररोज दोनशे कुपनांचे वाटप केले जाते. त्यामुळे सर्वांना डिझेल मिळत आहे आणि वादाचे प्रसंग आपोआप टळत आहेत.

झुरळ नाव जरी चांगलं वाटत नसलं तर देशातील तरुण त्या पार्टीच्या पाठीमागं उभे राहिले, हे महत्वाचं आहे : अण्णा हजारे

सरन्यायाधीशांनी झुरळ कोणत्या हेतून म्हटलं आहे, हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. पण, झुरळ जरी म्हटलं तरी त्या पार्टीच्या पाठीमागे देशभरातील तरुण मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. त्यांचा झुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता. एक गोष्ट चांगली आहे, झुरळ हे नाव चांगलं वाटत नसले तरी त्या पार्टीच्या पाठीमागं तरुण उभे राहिले. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती समजून त्यांच अवहेर न करता त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.

सिल्लोडला सावत्रपेक्षाही वाईट वागणूक : अब्दुल सत्तार; त्यांनी माझ्याशी येऊन भेटावं : संजय शिरसाट

सिल्लोड-सोयगाव या आमच्या मतदारसंघाला सावत्रपेक्षाही वाईट वागणूक मिळत आहे. रोग वाढण्याआधी उपाय करा, अशी तक्रार निधी वाटपावरून माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली होती. त्याला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. त्यांची तक्रार मी ऐकली नाही किंवा वाचली नाही. निधी हा काही गुपचूप वाटला जात नाही, तो जिल्हाधिकारी कार्यालयातून वाटप केला जातो. निधीबाबत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना काही शंका असेल तर त्यांनी मला येऊन भेटावं, असे आवाहन संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.

Vijay Patkar : उमेदवारीचा अर्जही भरू दिला नाही

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एका मंत्र्यांकडून होत आहे, असा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर मला उमेदवारीचा अर्जही भरू दिला नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

Motegaonkar Land Deal पुण्यात मोटेगावकरची कोट्यवधींची जमीन

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरच्या मालमत्तांबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय.. त्यांनी पुण्यातील वारजे परिसरात 51 गुंठे जमीन खरेदी केल्याचं उघड झालंय आहे. 2023 मध्ये खरेदी केलेल्या या जमिनीची किंमत 35 ते 40 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. दरम्यान या व्यवहाराची तपास यंत्रणा चौकशी करणार आहे.

| Parbhani Fuel Crisis परभणीत 9 दिवसांपासून डिझेल टंचाई

परभणी जिल्ह्यात मागील नऊ दिवसांपासून डिझेल टंचाई कायम आहे. त्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांचे हाल होत आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर “डिझेल उपलब्ध नाही”चे फलक लावण्यात आले आहेत. ज्या पंपावर डिझेल मिळत आहे, तिथे पहाटेपासूनच मोठ्या रांगा लागत आहेत. शेतीची कामे आणि पेरणीपूर्व तयारीवरही याचा परिणाम होत आहे.

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, आदित्य ठाकरे अमित ठाकरेंना भेटले

अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ येथे आदित्य ठाकरेंनी अमित यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. ठाकरे कुटुंबातील या भेटीमुळे शिवसेना आणि मनसेच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

काॅक्रोच जनता पार्टीचे कम बॅक

अभिजित दीपके यांनी शनिवारी ट्विट करत सांगितले की, 'माझे वैयक्तिक इंस्टाग्राम खाते हॅक झाले. ट्विटरने खाते निलंबित केले. बॅकअप खाते देखील बंद करण्यात आले.'Cockroach Janata Party' चे अधिकृत इंस्टाग्राम खाते हॅक करण्यात आले आहे. या खात्याचा ॲक्सेस आता आमच्यासाठी नाही.' दरम्यान, आज त्यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे की, आम्ही इन्स्टाग्रामवर परत आलो आहोत! अकाउंट रिकव्हर केले आहे.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झालेत. विधानपरिषदेच्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी ते दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला न्यायालयाकडून परवानगी

'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाने झटका दिला आहे. न्यायालयाकडून आमदार असलेल्या संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी देण्यात आली आहे.

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; कसारा-कल्याण मार्गावर लोकल सेवा विस्कळीत

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली आहे. पावर सप्लाय बंद पडल्याने कसारा-कल्याण मार्गावर पहाटेचलोकल सेवा ठप्प झाली आहे.

‘व्हाईट हाऊस’ परिसरात भीषण गोळीबार, एक ठार

अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’ परिसरात शनिवारी भीषण गोळीबाराची घटना घडली आहे. हा गोळीबार झाला तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसच्या आतमध्येच उपस्थित होते. मात्र, राष्ट्राध्यक्षांसह सुरक्षेच्या गराड्यात असलेल्या सर्वच महत्त्वाच्या व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

काॅक्रोच जनता पार्टीचे अकाऊंट हॅक करण्यामागे आयबी - नाना पटोले

कॉक्रोच जनता पार्टी, या सोशल मीडिया हँडलचे अकाऊंट ब्लॉक आणि हॅक करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा (आयबी ) हात असून सोशल मीडियावरील विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com