कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने रणशिंग फुंकत ३० जागांवर दावा करत थेट महायुतीलाच आव्हान दिले.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करून ८१ जागांवर महायुतीचे नगरसेवक निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला.
रंकाळा तलाव सुशोभीकरण, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवा, सर्किट बेंच मंजुरी यासारखी विकासकामे दाखवत काँग्रेसच्या आरोपांना कामातून उत्तर द्यावे, असे त्यांनी सांगितले.
Kolhapur, 22 Septmber : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. या मेळाव्यातून थेट महायुतीलाच आव्हान देत 30 जागांवर दावा केला आहे. मात्र, महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना केले आहे.
आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) म्हणाले, कार्यकर्त्याला संधी द्यायचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. कोल्हापूरच्या मतदारांनी ठरवलं आहे की, महायुतीचा महापौर महापालिकेत पाठवायचा. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांच्या विश्वासामुळे शिवसेनेचा जनाधार वाढला आहे. विनाकारण खोटे आरोप करून बदनाम केले जात आहे. आरोपाला कामातून उत्तर द्या. गेली अनेक वर्षे महापालिकेवर सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसला जाब विचारावा.
आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीचे (Mahayuti) ८१ जागांवर नगरसेवक निवडून येतील. पदाधिकारी, कार्यकर्ते जीवाचं रान करून प्रत्येक निवडणुकीला सामोरे जातात, त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडून आणायची जबाबदारी आमची आहे, असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
राजेश क्षीरसागर म्हणाले, गांधी मैदानाचा विकास केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. कनव्हेक्शन सेंटरमुळे विकासाची संधी मिळणार आहे. शिवसेनेमुळे ५०७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ठ करून घेण्यात आले आहे.
रंकाळा तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. कोल्हापुरात सर्किट बेंच महायुतीने मंजूर केले आहे. अशी अनेक विकास कामे केली आहेत. थेट पाईपलाईनचे काम दर्जेदारपणे करणार, असा टोला आमदार क्षीरसागर यांनी लगावत सत्ताधारी काँग्रेसला लाज वाटली पाहिजे.
महायुतीला संधी द्यावी, कोल्हापूर शहरातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी एकजुटीने कामाला लागावे. कोल्हापूर उत्तरमधील ३० जागा मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभे राहा आणि महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, अशा सूचना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना केल्या.
प्र: कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने किती जागांवर दावा केला आहे?
उ: शिवसेनेने ३० जागांवर दावा केला आहे.
प्र: आमदार राजेश क्षीरसागर यांनी महायुतीबाबत काय भाकीत केले?
उ: महायुतीचे ८१ नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्र: शिवसेनेने कोणती महत्त्वाची विकासकामे अधोरेखित केली?
उ: रंकाळा तलाव सुशोभीकरण, ५०७ कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायम सेवा, सर्किट बेंच मंजुरी ही प्रमुख कामे नमूद केली.
प्र: काँग्रेसवर काय आरोप करण्यात आले?
उ: महापालिकेवर अनेक वर्षे सत्ता भोगूनही विकासात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.