Raju Shetti, Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti Vs Hasan Mushrif : थेट इशारा देत राजू शेट्टींनी मंत्री मुश्रीफांचे चॅलेंज स्वीकारले...

Sugar Factory Politics : कारखानदारांनी 400 रुपयांबाबत भूमिका जाहीर करावी

Rahul Gadkar

Kolhapur Political News : 'मंत्री मुश्रीफ यांनी सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची साखर विकण्याचे दिलेले आव्हान मी स्वीकारतो. यापेक्षा सर्व कारखान्यांनी दरमहा साखर कशी दराने व कोणाला विकली याचा खुलासा करावा. त्यानंतर दूध का दूध व पाणी का पाणी होईल. कारखानदारांनी 400 रुपयांबाबत भूमिका जाहीर करावी; अन्यथा पुराव्यानिशी सगळंच जाहीर करू', असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. (Latest Political News)

राजू शेट्टी म्हणाले, 'देशातील व राज्यातील उसाचे उत्पादन कमी होणार व साखरेचे दर वाढत चालले आहेत हे सर्वांना माहीत आहे. यामुळेच कारखान्याकडून एफआरपीमध्ये वाढ करून देण्याची रास्त मागणी ऊस परिषदेमध्ये केली आहे. सहकारी साखर कारखाने उभारणी केल्यापासून तोट्यात आहेत. मात्र, याच लोकांचे खासगी कारखाने नफ्यात आहेत. त्या कारखान्यांनी ३० टक्क्यांपासून ५० टक्क्यापर्यंत डिव्हिडंट दिले आहे. ज्या खासगी कारखान्यांनी सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर घेऊन चालवित आहेत, ते ४०० कोटींपेक्षा जास्त कर्ज फेडून नफ्यात चालून इतरापेक्षा जास्त देत आहेत, मग हे सहकारी साखर कारखान्यांना का जमत नाही,' असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

गाळप हंगाम कमी झाल्याने कारखाने तोट्यात जात असल्याचे मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे म्हणणे बरोबर आहे, पण यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व संघटना जबाबदार नसून साखर कारखानदारांनीच हव्यासापोटी गाळप क्षमता वाढविल्याने त्याचे परिणाम आता कारखान्यांना भोगावे लागत आहेत. गेली २०-२० वर्षे कारखाने चालवूनही कारखाने तोट्यात जात आहेत हे माहीत असतानाही गाळप क्षमता व विस्तार कशासाठी वाढविला? असा सडेतोड प्रश्न शेट्टींनी मुश्रीफांना विचारला आहे.

शेतकरी अडचणीत आहेत हे मान्य असूनही राज्यकर्ते व साखर कारखानदार यांनी एकत्रित येऊन नाबार्डकडून कारखान्यांना साखर तारण कर्ज ४ टक्के व्याज दराने पुरवठा करणे , इथेनाॅलचे दर वाढविणे, साखरेचे दर वाढविणे यांसारखे साखर उद्योगासाठी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे होते. मात्र, याबाबत बोलण्याची कोणाचीच हिम्मत नाही. याउलट सरकार व कारखानदार मिळून शेतकऱ्यांचा बळी घेणार असाल, तर शेतकऱ्यांनाही संघटित होऊन रस्त्यावरची लढाई अधिक आक्रमक करावे लागेल, असा इशारा शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.

...तर पुराव्यानिशी जाहीर करू

मंत्री हसन मुश्रीफ यांनी मला जिल्ह्यातील मोजक्या कारखान्यांची माहिती दिल्यानंतर मी त्यामधून कशापद्धतीने ४०० रुपये देता येतात, याबाबत खुलासा केला आहे. उर्वरित कारखान्यांची माहिती आजच द्यावी, उद्या या सर्व कारखान्यांना कसा दर देता येतो, याबाबत मी पुराव्यानिशी जाहीर करणार, असे प्रत्युत्तर राजू शेट्टी यांनी दिले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT