सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षकांनीच महिला डॉक्टरवर अत्याचार केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच बिघडले आहे. इतकेच नव्हे तर राज्याच्या पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याने गृह मंत्रालयावर देखील विरोधकांनी टीकेचे बाण सोडलेत. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अशा काही मस्तवाल वागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कोल्हापुरात बोलत असताना इशारा दिला आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील खडेबोल सुनावले आहेत.
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल भाष्य केले. कोणत्याही गोष्टीमध्ये राजकारण करु नका. या आत्महत्या प्रकरणात स्थानिक नेत्यांबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका असती तर मी नावाचा देवाभाऊ आहे, लगेच कार्यक्रम रद्द केला असता असे म्हणत त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना क्लिनचीट दिली.
त्यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, 'मुख्यमंत्री फलटनला गेले होते तेव्हा, निंबाळकर यांनी खुलासा करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आत्महत्या प्रकरणात क्लिनचीट बाबत खुलासा केला, बहुतेक ते ठरवून आले होते. भाजपचा माणूस दिसला की मुख्यमंत्री सर्टिफिकेट देतात. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचा खुलासा करावा की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे. वर्दीतला पोलीस अधिकारी असे करत असेल, तरीदेखील तो बिनधास्त फिरतो, सरकारी डॉक्टरवर पोलीस बलात्कार करतो मग कायदा आणि सुव्यवस्था कुठे राहिला, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.
चौकशीमध्ये नेमकं सत्य बाहेर येईल. पण त्या मुलीचा जीव गेला आहे. शेतकऱ्यांच्या मुली रस्त्यावर पडलेल्या नाहीत कोणीही यावं आणि अत्याचार करावा. हे आम्ही कदापी सहन करणार नाही. जर पोलीस अधिकारी असे वागायला लागले तर आम्ही वर्दीचा मुलाइजा राखणार नाही ठोकून काढू, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी इशारा देत पोलीस अधिकारी जर असे वर्तन करावे लागले तर गृहमंत्र्यांचे वचक अशा अधिकाऱ्यांवर नाही. बदलीसाठी पैसे दिले मग मी कसेही वागायचे अशी मस्ती पोलीस अधिकाऱ्यांना आहे, असे शेट्टी म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावाने बोंब मारली जाते. आता पावसाच्या नावाने बोंब मारा. पण यंदा आम्ही 3751 रुपयाची मागणी केली आहे. जोपर्यंत बोलायचे आहे. ते दहा तारखेपर्यंत बोला. दहा तारखेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे. जोपर्यंत कारखानदार अधिकृत ऊस दर जाहीर करत नाही. तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना बोलणार नाही. असे सांगत बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. अचानक मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावलं. त्यामुळे बैठकीला कसे जाणार, असेही शेट्टी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.