Bihar Assembly Elections : राहुल गांधी, प्रियांका गांधी बिहारच्या मैदानात उतरणार, प्रचाराची रणनीती ठरली!

Congress Rahul Gandhi Priyanka Gandhi : बिहार निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी प्रियांका गांधी उतरणार आहेत. काँग्रसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी या विषयी माहिती दिली आहे.
Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Rahul Gandhi, Priyanka GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News : बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिहारमध्ये सभा देखील झाली. मात्र, काँग्रेसकडून कोणताही मोठा नेता अजून मैदानात उतरलेला नाही. त्यामुळे काँग्रेस निवडणुकीत प्रचारात काहीशी मागे दिसत आहे. मात्र, छठ पुजेनंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी बिहारमध्ये येणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी सांगितले.

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे देखील बिहारच्या निवडणूक प्रचारात सक्रीया होणार आहेत. राहुल हे 29 आणि 30 ऑक्टोबरला बिहारमध्ये असणार आहेत.

राहुल गांधी यांनी बिहार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी बिहारमध्ये अधिकार यात्रा काढत तब्बल 20 जिल्ह्यांमधून प्रवास केला होता. ही यात्रा तब्बल 1 हजार 300 किलोमीटरची होती.मात्र, बिहार विधानसभेची निवडणूक झाल्यापासून बिहारच्या राजकारणात राहूल गांधी सक्रीय नसल्याचे दिसून येत होते. तिकीट वाटपावरून देखील बिहार काँग्रेस अंतर्गत धुसफूस सुरू आहे.

काँग्रेस राष्ट्रीय जनता दलसोबत ही निवडणूक लढत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठे नेते, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे बिहार निवडणुकीत लक्ष घालत आहेत. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव हे महागठबंधनचे मुख्यमंत्रि‍पदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Girish Mahajan Politics : अन् एका रात्रीत खाट पाडली, रोहिणी खडसेंचा पराभव कसा केला ते गिरीश महाजनांनी सांगितलं..

बिहारमध्ये काँग्रेस 60 पेक्षा अधिक जागांवर लढत आहे. मात्र, राहुल गांधी ज्या सामाजिक न्यायाची गोष्ट करतात त्या प्रमाणे सर्व समाजाला प्रतिनिधीत्व देणारे तिकीट वाटप झाले नाही, असा आरोप काँग्रेसचे काही नेते करत आहेत. काँग्रेसने तिकीट विकली, असा आरोप करण्यात येत आहे.

अशोक गहलोत म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत असे इच्छुक असतात त्यांना पक्षाकडून उमेदवारी देणे शक्य नसते. त्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग होतो. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी त्यांची नाराजी सार्वजनिकरित्य व्यक्त करू नये. बिहारच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Malegaon fake birth certificate scam : किरीट सोमय्या सुपारीबाज नेता, निवडणुकीसाठी मालेगावची बदनामी करतात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com