Raju Shetti 1 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti protest : मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात जाऊन राजू शेट्टींचा इशारा; म्हणाले, ''गुडघे टेकायला लावू''

Swabhimani Shetkari Sanghatana Strong Message to Mahayuti : स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे.

Rahul Gadkar

Shaktipeeth Highway Kolhapur : शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात विरोध होत असताना, पुन्हा एकदा राज्य सरकारकडून कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग करण्याच्या तयारीला वेग दिला गेला आहे. तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विविध मार्गाने दबाव टाकला जात असल्याचा आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने यापूर्वीच केलेला आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात जाऊन महायुतीला थेट गुडघे टेकायला लावण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या एका किलोमीटर रस्त्याला येणारा खर्च आणि शक्तिपीठ महामार्गासाठी एक किलोमीटरच्या रस्त्याला येणारा खर्च मांडत महायुती सरकारला धारेवर धरले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास एक किलोमीटर रस्ता करण्यास ३५ कोटी खर्च येतो, तर शक्तिपीठ महामार्गाच्या एक किलोमीटर रस्त्यास १०७ कोटी ६० लाख रुपये खर्च आहे. महामार्गाच्या ८६ हजार कोटी रुपयांतून कोणाला पोसणार आहात? असा सवाल उपस्थित करत या किमतीतून ठेकेदार, राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्र्यांना पोसायचे आहे. असा राजू शेट्टी यांनी घणाघात केला आहे.

तसेच, त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना दंडवत घालायला लावणाऱ्यांना गुडघे टेकायला लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही’, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.  शक्तिपीठ महामार्गविरोधी जनजागृती सभेत ते बोलत होते.

शक्तिपीठ मार्गाला समांतर मार्ग असताना या रस्त्याची राज्याला गरज नाही. शक्तिपीठच्या ८६ हजार कोटींतून ५० ते ५५ हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी महामार्गाचा घाट घातला जात आहे का? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT