
India-Pakistan agreements Update : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये टोकाचा तणाव निर्माण झालेला आहे. भारताने दहशतवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी आणि पाकिस्तानालही जबरदस्त धडा शिकवण्यासाठी मोठे निर्णय घेणे सुरू केले आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने सिंधू जल करारास स्थगिती दिली गेली आहे. तर याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने देखील शिमला करार रद्द केला आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेले महत्त्वपूर्ण करार आणि त्यांची सद्यस्थिती काय?
उद्देश – दोन्ही देशांतील सरकारं आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण करतील. यामध्ये त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी व अंमलबजवाणीवर लक्ष ठेवण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाची स्थापना देखील समाविष्ट होती.
काय घडले? – भारतात अल्पसंख्यांकांना भरभराटीचे स्वातंत्र्य मिळाले, मात्र पाकिस्तानात कायमच अल्पसंख्यांकावर मोठ्याप्रमाणात अत्याचार झाले.
उद्देश – या कराराअंतर्गत पश्चिमी नद्या सिंधू, झेलम आणि चिनाबचे पाणी पाकिस्तानच्या आणि पूर्व नद्या रावी, ब्यास व सतलजचे पाणी भारताला दिले गेले.
काय घडले? - करार ६५ वर्षांपर्यंत प्रभावी राहिला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तो स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
उद्देश – करारात ठरवले गेले आहे की, कोणताही पक्ष एकतर्फी कारवाई नाही करणार. दोन्ही देशांधील वादांना द्विपक्षीयरित्या सोडवले जाईल आणि नियंत्रण रेषेचा सन्मान करावा लागेल.
काय घडले? – आता पाकिस्तानने हा करार स्थगित करण्याची घोषणा केली आहे. एलओसीची निर्बंध संपुष्टात येतील, ज्यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या प्रदेशांवर हल्ला करू शकतील.
उद्देश – भारत आणि पाकिस्तानच्या तीर्थस्थळांच्या यात्रा सुविधाजनक बनवणे. २०१८पर्यंत या करारात पाकिस्तानात १५ आणि भारतात पाच अशा स्थळांचा समावेश आहे.
आता काय परिस्थती – सध्यातरी तो स्थगित करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही.
उद्देश – दोन्ही देश प्रत्येक वर्षी एकमेकास आपल्या अणवस्त्र प्रतिष्ठानं आणि सुविधांबाबत माहिती देतील. करारानुसार दोन्ही देश प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या असे कार्य करणार नाहीत, ज्यामुळे अणवस्त्र प्रतिष्ठांनांचे नुकसान होईल
आता काय परिस्थिती? – या वर्षापर्यंत दोन्ही देशांनी माहिती दिली. मात्र पाकिस्तान आता हा करार रद्द करण्याची भाषा करत आहे.
उद्देश - दोन्ही देशांमध्ये अनावधनाने हवाई क्षेत्रातील उल्लंघनाचा धोका कमी करणे. लष्करी विमाने एकमेकांच्या हवाई हद्दीपासून दहा किलोमीटर अंतरावर उड्डाण करणार नाहीत. पूर्वपरवानगी शिवाय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई आहे.
आता काय पिरस्थिती? – पाकिस्तानने भारतीय उड्डाणांसाठी तत्काळ प्रभावाने आपले हवाई क्षेत्र बंद केले.
उद्देश – दक्षिण आशियात सैन्य तणाव कमी करणे. दोन्ही देशांमधीरल अणवस्त्र शर्यत संपवून आपसातील संघर्षापासून वाचणे.
काय घडलं? – कराराच्या अवध्या अडीच महिन्यानंतरच पाकिस्तानने कारगील युद्ध छेडलं आणि करार स्वत: नष्ट केला.
उद्देश – नियंत्रण रेषा आणि संघर्षविरामाच्या दिशेने सहमती
काय घडलं? – २००८पासून पाकिस्तानने नियमित उल्लंघन केले. २०२१मध्ये दोन्ही देशांनी करारावर प्रतिबद्धता दर्शवली. परंतु पाकिस्तानी सैन्याकडून कराराचे उल्लंघन सुरू राहिले अन् मग भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले.
याशिवाय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परिक्षणाची पूर्व सूचना, अणवस्त्र धोके आणि रेडिएशनच्या धोक्यांना कमी करण्यासारखे करारही दोन्ही देशांमध्ये झाले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.