Raju Shetty, Awabhimani Shetkari Sanghtna Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका .. राजू शेट्टी यांच्यासह 150 जणांवर गुन्हा

Rahul Gadkar

Sangli News : जिल्हाधिका-यांचा जमावबंदी आदेश जुगारून राजारामबापू कारखान्याच्या गाडी तळावर बेकायदा जमाव केल्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह दीडशे जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर बेकायदा जमाव जमवत दहा तास कारखाना बंद पाडून लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ही या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला आहे.

ऊस दरावरून कोल्हापुरातील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. १ डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेट्टी यांनी इस्लामपूर येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यावर धडक मारली. दुपारी 12 ते रात्री दहा वाजेपर्यंत इस्लामपुरातील कारखान्यावर शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या मारला होता. या काळात काही कार्यकर्त्यांनी उसाच्या गव्हाणीत देखील उड्या मारल्या होत्या. या घटनेनंतर कारखाना काही तास बंद राहिला. जिल्हाधिकारी राजानंदी यांनी बंदी आदेश काढूनही जमाव केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार तसेच कारखान्याचे साखर, इथेनॉल उत्पादन, डिस्टिलरी व को-जनरेशन विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हणून कारखान्याचे सचिव दिलीप महादेव पाटील यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

स्वाभिमानी आणि कारखानदारांची बैठक निष्फळ

सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दरावर तोडगा काढावा अशी भूमिका शेट्टी यांची आहे. त्या पार्श्वभूमीवर एक डिसेंबर राजारामबापू सहकारी साखर कारखान्यावर मोर्चा काढल्यानंतर कारखानदार आणि स्वाभिमानीची बैठक रविवारी पार पडली. कारखानदार स्वाभिमानची मागणी मान्य करण्यास तयार नसल्याने ही बैठक निष्फळ ठरली आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT