New Delhi News : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार पासून सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान लोकसभेत पोहोचले तेव्हा एनडीएच्या खासदारांनी टाळ्या वाजवून त्यांचे लोकसभेत स्वागत केले. लोकसभेच्या कामकाजाला उपस्थित राहण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर विशेषत: काँग्रेसवर ताशेरे ओढले. विरोधकांनी आता हे समजून घ्यावे लागेल की, निवडणुकीतील पराभवाचा राग सभागृहात काढण्याऐवजी कामाला लागावे.असा सल्ला त्यांनी कॉग्रेसला दिला.
हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या निकालांवर विरोधकांची खरडपट्टी काढली आणि देशाने नकारात्मकता नाकारल्याचे सांगितले. लोकशाहीचे हे मंदिर लोकांच्या आशा-आकांक्षांसाठी आणि विकसित भारताचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे. सभागृहात जी काही विधेयके ठेवली आहेत त्यावर सखोल चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विरोधकांवर खरपूस समाचार घेत पंतप्रधान पुढे म्हणाले की, सध्याच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षात बसलेल्या मित्रांसाठी हे अधिवेशन सुवर्णसंधी आहे. या अधिवेशनात पराभवाचा राग काढण्याचे नियोजन करण्याऐवजी या पराभवातून धडा घेतला आणि गेल्या 9 वर्षातील नकारात्मकतेचा कल सोडून सकारात्मकतेने या अधिवेशनात पुढे गेले तर देशाची दिशा बदलेल. असा सल्ला त्यांनी दिला.
पंतप्रधान पुढे म्हणले, लोकशाहीत विरोधकांनाही महत्त्वाचे स्थान आहे. विरोधकांची प्रतिमा द्वेषाची आणि नकारात्मकतेची बनली तर ते चांगले नाही. भारत 2047 मध्ये विकसित बनण्याची जनतेची आकांक्षा आहे आणि जनता यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. त्यांनी या भावनेचा आदर करून सभागृह जोरदारपणे पुढे नेले पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.