devendra-fadnavis-raju-shetti.jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju shetti : पुणे-बेंगलोर हायवेवरील टोल वसुली थांबवा; मुख्यमंत्र्यांकडे राजू शेट्टींनी घातले साकडे

Pune Bangalore Highway toll News : कोल्हापूर ते पुणे व कोल्हापूर ते बेळगांव या महामार्गाची टोल आकारणी थांबवावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे राजू शेट्टी यांनी केली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देशातील जे महामार्ग खराब व खड्डे पडलेले आहेत. त्याबाबत टोल आकारणी करता येणार नसल्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कानउघडणी केली आहे. यामुळे तातडीने कोल्हापूर ते पुणे व कोल्हापूर ते बेळगांव या महामार्गाची टोल आकारणी थांबवावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे राजू शेट्टी यांनी केली आहे.

केंद्र व राज्य सरकारने बांधा वापरा व हस्तांतरीत करा (बीओटी) या योजनेतून रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. सदर रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची झाली असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक महामार्गाच्या कामांचे रूंदीकरण सुरू असून रस्त्यावर वाहतूक करत असताना वाहतूकधारांना फटका बसत आहे. पुणे -कोल्हापूर व कोल्हापूर -बेळगांव महामार्ग हा रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता अशा पध्दतीचा झाला आहे.

केरळ उच्च न्यायालयात खराब झालेल्या अथवा दुरूस्ती सुरू असणाऱ्या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गास टोल आकारणी करता येणार नाही असा निकाल दिला आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयात गेले पण सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा नागरिकांना कोणताही टोल न आकारणी करता रस्त्यावर प्रवास करू द्यावा. त्यांनी आधीच त्यांच्यासाठी कर भरलेले आहेत. त्यांना अशा गटारयुक्त, खड्डेमय रस्त्यावर प्रवास करण्यास भाग पाडतांना टोल वसुली करू नये.

ही तुमच्या कार्यक्षमतेची निशाणी आहे, अशा शब्दात सध्याचे सरन्यायाधीश व तत्कालीन जस्टिस भूषण गवई ,जस्टिस विनोद चंद्रन , जस्टिस अंजारिया यांनी फटकारून याचिका फेटाळून लावली आहे

यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते व वाहतूक मंत्रालय भारत सरकार यांना तातडीने अशा रस्त्यावरील टोल बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. याबाबत संबधिताकडून येत्या आठवड्याभरात कारवाई न झाल्यास अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT