Jayant Patil praises Fadnavis : जयंत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक... भाजपमधील त्यांचा दराराही सांगितला!

BJP internal rift News : माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यासोबतच फडणवीस यांचा भाजपमधील असलेला दरारा देखील सांगितला.
Devendra Fadnavis, Jayant Patil
Devendra Fadnavis, Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगेलच तापले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यासोबतच फडणवीस यांचा भाजपमधील असलेला दरारा देखील सांगितला.

माजी मंत्री जयंत पाटील यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सीएम फडणवीस यांच्या कामांचे कौतुक करीत असताना त्यांच्या कारभाराबद्दल मोठे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा 2014 साली मुख्यमंत्री झाले, त्यावेळी ते खूप उत्साही वाटत होते. अलीकडच्या काळात काय झाले आहे की, ते प्रशासनाऐवजी इतर गोष्टीवर जास्त लक्ष देत असावेत, असे वाटते. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी समाजात बोलल्या जात असल्याचे सांगत त्यांना उत्तम ज्ञान असल्याचे यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis, Jayant Patil
Shivsena Politics : नीलेश राणे केसरकरांना रिटायर्ड करणार? पुढचा आमदार ठरवल्यानं शिवसेनेत 'जिरवा-जिरवी'चं राजकारण रंगणार

फडणवीस राजकारणी व मुख्यमंत्री म्हणून कसे वाटतात? असा प्रश्न पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, 'कोणता निर्णय कधी घेतला पाहिजे, याचे प्रसंगावधान त्यांच्याकडे आहे. भाजपमध्ये ते सध्या एकमेव नेते आहेत. दुसरा नेता कोणी नाही. बाकीचे कोणी नेते प्रयत्नही करीत नाहीत.'

Devendra Fadnavis, Jayant Patil
BJP Symbol History : भाजपच्या डोक्यात 'कमळ' नव्हतेच..., सुरुवातीची 3 चिन्हं कोणती होती?

भाजपमधील इतर नेत्यांना प्रयत्न करू दिले जात नाहीत का? अशी विचारणा केली असता त्यांनी 'तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे स्पष्ट केले. तुम्ही त्या वर्तुळात असल्याने तुम्हाला काय दिसते? या प्रश्नाचे उत्तर देताना पाटील म्हणाले की, त्यासाठी पक्षातील इतर कोणाला धाडसही करू दिले जात नाही. त्यासाठी पक्षातील इतर कोणी प्रयत्नही करीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis, Jayant Patil
Pune Metro Update: स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावर दोन नव्या स्थानकांना मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

त्यासोबतच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष नसल्याने आता खूप रिलक्स वाटते. ही जबाबदारी सांभाळत असताना राज्यातील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर असल्याने त्याचे प्रेशर कायम असतेच. कारण की त्या सर्वांचे उत्तरदायित्व आपल्यावर असते. त्यांना उत्तर आपल्याला द्यावयाचे असते. त्यामुळे ती माझ्यासाठी मोठी जबाबदारी होती. सात वर्ष मी ही जबाबदारी संभाळली. आता खूप रिलक्स वाटत असल्याचे पाटील यांनी एका प्रश्नाला स्पष्ट केले.

Devendra Fadnavis, Jayant Patil
Devendra Fadnavis : फडणवीस ठाण्यात आले, शिंदेंनी भाईचाराही दाखवला... पण गणेश नाईक ऐकेनात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com