Jayant Patil Exclusive : राष्ट्रवादी फुटीवर दोन वर्षानंतर जयंत पाटलांचे मोठं वक्तव्य; म्हणाले, 'काही नेते...'

Jayant Patil statement News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन वर्ष झाल्यानंतर याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वर्षापूर्वी उभी फूट पडली होती. यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीमधील सुमारे 40 आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद तर सोबत गेलेल्या काही आमदारांना मंत्रिपद देण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन वर्ष झाल्यानंतर याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मोठे विधान केले आहे.

माजी मंत्री जयंत पाटील यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली? अजित पवार बाहेर गेले काही अंदाज होता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी पाटील म्हणाले, 'अंदाज नव्हता. मात्र, काही जणांचा आग्रह होता,' असे त्यांनी सांगितले.

Jayant Patil
Jayant Patil praises Fadnavis : जयंत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक... भाजपमधील त्यांचा दराराही सांगितला!

पक्ष फुटणार याची वरिष्ठ नेत्यांना कल्पना होती, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले होते? या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, 'काही जणांचा आग्रह होता, मात्र पवार साहेब त्याला मान्यता देत नव्हते. त्या बाजूला मला येता येणार नाही, असा शरद पवार साहेबांनी स्टॅन्ड घेतला होता. त्यावेळी काही जणांनी एकत्र येऊन हा अचानक निर्णय घेतला. या अचानक घेण्यात आलेल्या निर्णयाची कल्पना शरद पवार साहेबांना नव्हती व मलाही त्याची काही कल्पना नव्हती.'

Jayant Patil
Devendra Fadnavis : फडणवीस ठाण्यात आले, शिंदेंनी भाईचाराही दाखवला... पण गणेश नाईक ऐकेनात!

2019 साली बंड झाल्यावर कोणीच हलले नव्हते. त्यामुळे कोणी जाणार नाही, असे वाटत होते. यावेळी सर्वाना एकत्रित बोलवण्यात आले. तोपर्यंत कोणालाच माहित नव्हते की एकत्रित कशासाठी बोलावले आहे. सगळ्याच्या एकत्रित सह्या घेत, एकत्रितच निर्णय घेतला. काही जणांची मूक संमती होती असे वाटते, असे जयंत पाटील यांनी जुने नेते जातील असे वाटले होते का? या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

Jayant Patil
Vaishali Suryawanshi BJP : वैशाली सूर्यवंशींनी भाजपचा झेंडा हाती घेताच वारे बदलले, कुणाची अडचण होणार?

शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचे कारण काय? या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, 'शशिकांत शिंदे हे पक्षातील उत्साही नेते आहेत. शरद पवार साहेबांच्या विचाराला धरून त्यांनी आयुष्यभर काम केले आहे. यश अपयश आले तरी त्यांनी पवार साहेबांना कधीच सोडले नाही. ते चांगले काम करु शकतील, असा विश्वास आहे. त्यांच्या नावाला माझी सहमती होतीच. ही पवार साहेबांची कल्पना होती. त्या निर्णयाला आम्ही सर्वानीच मिळून पाठिंबा दिला.'

Jayant Patil
Shivsena Politics : नीलेश राणे केसरकरांना रिटायर्ड करणार? पुढचा आमदार ठरवल्यानं शिवसेनेत 'जिरवा-जिरवी'चं राजकारण रंगणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com