Raju Shetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti on Sugarcane FRP : ''शेतकऱ्यांनी संयम सोडला तर... '', राजू शेट्टींचा राज्य सरकारला थेट इशारा!

Swabhimani Shetkari Sanghatana : कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने पेटवली; आंदोलन चिघळले

Rahul Gadkar

Sugarcane FRP News : ऊसदर आणि मागील हंगामातील ज्यादा साखर दरातील 400 रुपये मिळावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरू असलेले आंदोलन चिघळले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने पेटवून दिल्याच्या घटना घडत आहेत.

शिरोळ तालुक्यात गुरुदत्त शुगर कारखाना परिसरात राडा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे.

अजूनही शेतकऱ्यांनी संयम सोडला नाही

शेतकऱ्यांनी संयम सोडला तर यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा राजू शेट्टी यांचा साखर कारखानदारांना इशारा दिला आहे. शेट्टी यांच्या भूमिकेमुळे पुढील काळात आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. ज्यांनी आमचे पैसे लुटले, त्यांना तुम्ही संरक्षण देता. आणि शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करता. असा जाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला जाईल. हा संघर्ष लवकर मिटला नाही, तर तीव्र होईल, असा इशाराही देण्यात आला.

पोलिस बघत बसतील का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 17 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कोल्हापूर विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालून जाब विचारतील, असा इशारा शेट्टी यांनी दिला होता. त्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. जर गृहमंत्र्यांना घेराव घातला तर पोलिस बघायची भूमिका घेतील का? असा खोचक टोला मुश्रीफ यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT