Tanaji Sawant : फडणवीसांनी निलंबित केलेल्या 'पीआय'च्या नियुक्तीसाठी मंत्री सावंतांचा तो आटापिटा...

Tanaji Sawant's Viral Video : धाराशिवच्या पोलिस अधीक्षकांना म्हणाले होते, मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही..
Tanaji Swant
Tanaji SwantSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : आरोग्यमंत्री, धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओची मोठी चर्चा झाली. धाराशिवच्या पोलिस अधीक्षकांशी बोलताना, नो डिस्कस, मी सांगितले ते करायचे... असे म्हणताना ते दिसत आहेत. पालकमंत्र्यांनी सांगितले ते करायचे म्हणजे नेमके काय करायचे, हे आता समोर येऊ लागले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करायची, असा आदेश ते पोलिस अधीक्षकांना देत होते, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, ज्या पोलिस अधिकाऱ्याची ते शिफारस करत आहेत, त्यांच्या निलंबनाची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी विधानसभेत केली होती.

Tanaji Swant
Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी'चं आंदोलन पेटलं; कोल्हापुरात ठिकठिकाणी जाळपोळ, कार्यकर्ते आक्रमक!

व्हायरल व्हिडिओनुसार पालकमंत्री सावंत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना एक काम सांगितले. ते काय होते, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकायला येत नाही किंवा तो भाग चित्रित झालेला नाही. त्यावर डिस्कस (चर्चा) करू, असे कुलकर्णी म्हणाले. त्यानंतर सावंत हातवारे करत म्हणताहेत, 'नाही डिस्कस वगैरे, नो डिस्कस, मी सांगितलं ते करायचे, मी मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही तर तुम्ही मला सांगितल्यावर ते कसं... करायचं म्हणजे करायचं. हां पुढे काही राडा झाला तर उचलून फेकू. त्याला काय, आपणच करणार की...'

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलसीबीच्या प्रमुखपदी अमुक पोलिस अधिकाऱ्याची निवड करावी, असे आदेश पालकमंत्री सावंत सार्वजिनक ठिकाणी अशा भाषेत, हातवारे करत 'पर्यावरणप्रेमी' पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांना देत आहेत. कुलकर्णी हे आयपीएस अधिकारी असून ते सावंतांचे कार्यकर्ते आणि अन्य पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समोर पालकमंत्र्यांची अशी भाषा निमूटपणे ऐकूण घेत आहेत. त्यामुळे पोलिस दलात खालपर्यंत काय संदेश गेला असेल, याचा विचार बोलताना पालकमंत्र्यांनी आणि ऐकून घेताना पोलिस अधीक्षकांनी करायला हवा होता.

पालकमंत्री ज्या अधिकाऱ्याची नियुक्ती करायला सांगत आहेत, त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे. हे अधिकारी गेल्या वर्षी बीड जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळच्या त्यांच्या कारनाम्यांची जंत्री केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सभागृहात लक्षवेधीद्वारे वाचून दाखवली होती. त्यानंतर त्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याच अधिकाऱ्याची एलसीबीसारख्या महत्त्वाच्या विभागात प्रमुखपदी नियुक्ती करावी, यासाठी पालकमंत्री सावंत यांनी तो आटापिटा केल्याचे आता समोर येत आहे.

व्हायरल व्हिडिओतील हा प्रसंग २९ ऑक्टोबरचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याला दुजोरा मिळालेला नाही. त्यानंतर काही दिवसांत संबंधित अधिकाऱ्यालाच एलसीबीचा प्रभार देण्यात आला आहे.

Tanaji Swant
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या; नांदेड जिल्ह्यात तरुणाने घेतले विष!

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाईतील अवैध धंद्यांबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. अंबाजोगाईच्या पोलिस निरीक्षकांनी अवैध धंद्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष केले असून, गुंडगिरीला आळा घालण्यात त्यांना अपयश आले आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्रास गुटख्याची विक्री सुरू आहे. पोलिस ठाण्यात गुंडांची वहिवाट असून, त्यांना सन्मानाची मागणूक मिळत असून, सामान्य नागरिकांचा अपमान केला जात आहे. या अधिकाऱ्याने गैरप्रकारांवर एकही मोठी कारवाई केलेली नाही. बनावट दारूच्या एका कारखान्यावर या अधिकाऱ्याने संशयास्पद ढापा मारला होता.

Tanaji Swant
Pathardi-Shevgaon BJP : ... म्हणून पाथर्डी-शेवगावात दिवाळीनंतर भाजपमध्ये धमाका होणार!

दुसऱ्याच दिवशी उत्पादन शुल्क विभागाने त्याच ठिकाणी छापा मारून मुद्देमाल जप्त केला होता, असे आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत सांगितले होते. त्यानंतर त्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

अशा या अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी पालकमंत्र्यांनी एका आय़पीएस अधिकाऱ्यासमोर मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, असे म्हणत विचित्र हातवारे केले होते. पोलिस अधीक्षक म्हणत आहेत, डिस्कस करू. याचा अर्थ पालकमंत्री ज्या अधिकाऱ्याबद्दल बोलत आहेत, तो वादग्रस्त असावा, मात्र ते समजून घेण्याची तसदी पालकमंत्र्यांनी घेतली नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com