भुईंज : ऊसदराकडे कारखान्यांचे दूर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी पाचवड (ता. वाई) येथील शेतकरी मेळाव्यात कारखानदारांविरोधात आसूड उगारणार आहेत. शुक्रवारी पाचवडला सह्याद्री मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.
वाई- खंडाळा तालुक्यासह पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे उसाचे बिल व सुरू हंगामातील ऊस उसाच्या दरासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. ४) पाचवड येथे शेतकरी मेळावा आयोजित केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे पाचवड (ता. वाई) येथे शेतकऱ्यांचा आसूड उगारणार आहेत, अशी माहिती शेळके यांनी दिली. ऊस पट्यातील तालुके म्हणून सातारा, जावळी, वाई, खंडाळा आणि कोरेगाव या तालुक्यांची ओळख आहे. शेतकरी आपल्या शेतात ऊस पिकवतो. ते पीक घेण्यासाठी शेतात भांडवल घालतो, राबतो; पण त्या मानाने त्याला तसा फायदा मिळत नाही.
ही शोकांतिका अलीकडच्या काळात बनली आहे. किसन वीर कारखान्याने गेल्या वर्षी शेतकऱ्यांची ऊसबिले दिली नाहीत. सुरू आर्थिक वर्षातील एफआरपीची रक्कम मिळाली पाहिजे, कारखान्यावरील कामगारांचे पगार मिळाले पाहिजेत, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांच्या नावावर बोगस कर्ज काढून घोटाळा केला आहे.
कुडाळ परिसरातील शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना बँकेला धडा शिकवण्यासाठी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता पाचवड येथील सह्याद्री मंगल कार्यालयात शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार आहेत. शेतकरी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेळके यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.