Ramdas Athawale, Prakash Ambedkar
Ramdas Athawale, Prakash Ambedkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramdas Athawale On Prakash Ambedkar : रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितले; आंबेडकरांना महाविकास आघाडी डावलणार....

Anil Kadam

Ramdas Athawale News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जातील,असे वाटत नाही. भारत जोडो यात्रेच्या समारोपात गेले होते. ते जरी मोदींच्या विरोधात असले तरी मी मोदींसोबत आहे. आंबेडकरी समाजासाठी ज्यांनी काम केले, त्यांच्यासोबत आपण गेले पाहिजे. आंबेडकरांना महाविकास आघाडीही घेणार नसल्याचा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा फायदा काँग्रेसला होणार नाही. लोकप्रियता कशी वाढवावी हे फक्त नरेंद्र मोदी यांनाच जमते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आरपीआय एकही जागा लढणार नाही. भाजपला पाठिंबा देणार आहे. या वेळी 400 पार आम्ही नारा दिला आहे. एनडीएच्या 400 हून अधिक आणि भाजपच्या 370 पेक्षा जास्त जागा निवडून येतील.

नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास म्हणत यापूर्वीच नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी भारत जोडला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची गरज नाही. त्यांच्या न्याय यात्रेचा समारोप मुंबईत झाला आहे. पण 4 जूनच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात त्यांचा समारोप झाला आहे. महाराष्ट्रात नवीन रस्ते, महामार्ग, सोयी सुविधा झाल्या आहेत. 80 लाख गरीब नागरिकांना पुढील पाच वर्षे मोफत धान्य देण्यात येणार आहे. त्यांचा फायदा सर्व जातीय धर्माच्या लोकांना होणार आहे.

...तर आम्हाला मान्यता मिळेल

मला शिर्डीमध्ये संधी मिळाली तर सोलापूरमध्ये आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजा सर्वदे इच्छुक आहेत. दोन जागा निवडून आल्या तर आमच्या पक्षाला मान्यता मिळेल. आमची ताकद वाढेल आमचा विचार करावा, अशी आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी प्रयत्न करत आहेत. पक्षाचा विचार करताना एका व्यक्तीचा विचार न करता पक्षाचा विचार करावा.

भाजपने हेगडेंवर कारवाई करावी

अनंतकुमार हेगडे यांच्या भूमिकेचा आणि भाजप नरेंद्र मोदी यांचा काही संबंध नाही. आता भाजप बदलली आहे. हेगडे नेहमीच विपर्यस्त अशी भूमिका मांडत असतात. संविधान कोणी बदलू शकत नाही. संविधान ज्यांना बदलायचे आहे, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. हेगडेच्या भूमिकेचा तीव्र निषेध करतो. त्यांच्यावर भाजपने कारवाई करावी, अशी मागणी राज्यमंत्री आठवले यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्हाला डावलल्यास नाराजी पसरेल

महायुतीत आरपीआयला डावलून चालणार नाही. आम्ही महाशक्ती जरी नसलो तरी आम्ही कोणाला निवडून द्यायचे हे ठरवणारे आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी महामंडळाची नियुक्ती करावी. जर जागा नाही मिळाली तर प्रचंड नाराजी पसरेल, असे मंत्री आठवले यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT