Sangali News : संजयकाकांनंतर पाणीप्रश्नावर महापालिका आयुक्तांकडून झाडाझडती; कर्मचाऱ्यांना दिला कारवाईचा...

Sangali Commissioner महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक पवार यांनी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील पाणीपुरवठ्याबद्दल येत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्तांनी विचारणा केली.
Sunil Pawar, Sanjaykaka Patil
Sunil Pawar, Sanjaykaka Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangali Mahapalika News : सांगली शहरातील अनेक भागांत अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. या प्रश्नावर खासदार संजयकाका पाटील यांनी बैठक घेतल्यानंतर महापालिका सुनील पवार यांनी तातडीची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी दिले. पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा न झाल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

सांगली महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक पवार यांनी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. सांगली शहरातील पाणीपुरवठ्याबद्दल येत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्तांनी विचारणा केली. पाणीपुरवठा विभागाने शुद्ध पाणी देण्याबाबत केलेल्या उपाययोजनेबाबत अभियंता अजहर अहमद मुल्ला, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी माहिती दिली.

कृष्णा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे पाणी अशुद्ध होत आहे, असा खुलासा कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. सध्या महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर होत असलेले पाणी शुद्धीकरण चांगल्या पद्धतीने होत असून, पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वास नाही. नदीपासून येत असलेल्या पाण्यामध्ये काही प्रमाणात अशुद्ध घटक मिळून आल्याचे सांगितले.

Sunil Pawar, Sanjaykaka Patil
Sangali News : प्रभाग रचनेने 'कही खुशी-कही गम'; सांगलीत आता 85 नगरसेवक

झालेल्या चुका सुधारून शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, वारंवार सूचना देऊन त्याकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला जाईल, असा इशारा आयुक्त पवार यांनी दिला.

उपायुक्त वैभव साबळे यांनीही पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. बोगस कनेक्शन तत्काळ शोधण्यात यावेत. यातील बोगस नळ कनेक्शनधारकांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. प्रत्येक प्रभागात लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करावा, नागरिकांच्या तक्रारी येता कामा नयेत, असे आदेश त्यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तज्ज्ञांची मदत घ्या

अशुद्ध पाण्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन पूर्तता करावी, अशी सूचना आयुक्त पवार यांनी दिली. कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला.

Edited By : Umesh Bambare

R

Sunil Pawar, Sanjaykaka Patil
Sangali Congress News : विशाल पाटलांच्या उमेदवारीचा मुंबईत फैसला; काँग्रेसची गुरुवारी बैठक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com