बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024 ) घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी ( 16 मार्च ) केली. पण, अद्यापही महायुतीचं जागावाटप रखडलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला कुठल्या जागा मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, छोट्या मित्रपक्षांना भाजपनं डावलल्याची खंत बच्चू कडू आणि महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे. अशातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी जागावाटपासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रिपब्लिकन पार्टीनं शिर्डी आणि सोलापूरच्या जागेची मागणी केली आहे. परंतु, शिर्डीची जागा शिंदे गटाकडे आणि सोलापूर भाजपकडे आहे. त्यामुळे रिपब्लिकन जागेच्या मागणीसंदर्भात अजून कोणता निर्णय झाला नाही. "रिपब्लिकन पार्टीला महाराष्ट्रात दोन जागा मिळण्याची अपेक्षा आहे. पण, जर तसं झालं नाही, तर मी त्यांची साथ सोडणार नाही," असं रामदास आठवलेंनी ( Ramdas Athawale ) स्पष्ट केलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"मी एनडीएमध्ये आहे. माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. एकही जागा नाही मिळाल्यानं मी एनडीएला सोडणार नाही. लगेच एनडीए सोडण्याचा विचार होत नाही," असं रामदास आठवले म्हणाले.
"आम्हाला सोलापूर आणि शिर्डीची जागा मिळावी, अशी मागणी आहे. रिपब्लिकन छोटा पक्ष असला तरी भाजप नेत्यांना भेटलो आहे. शिंदे गटाचे खासदार शिर्डीत आहेत. पण, मला तिथून संधी दिली, तर महाराष्ट्राचा विकास करण्यात फायदा होईल. महाराष्ट्रातील सत्तेत आम्हाला वाटा मिळाला नाही. अजितदादांचा विस्तार झाला. पण, आमचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपद द्यावे," अशी इच्छा रामदास आठवलेंनी व्यक्त केली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.