Ramesh Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramesh Kadam on Mohol Constituency: जेलमधून सुटलेल्या रमेश कदमांचा मोहोळवरच डोळा; ‘शरद पवार, अजितदादांना भेटून घेणार राजकीय निर्णय’

NCP Former MLA News : पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Thane : तब्बल आठ वर्षांनंतर तुरुंगातून सुटका होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी येत्या आठ ते पंधरा दिवसांत मोहोळ मतदारसंघात येण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मतदारसंघातील जनतेशी बोलून, तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मोहोळचे राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Ramesh Kadam, released from jail, has his eye on Mohol)

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना आठ वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यांची आज ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. सुटकेनंतर ते माध्यमांशी बोलत होते. मी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचे रमेश कदम यांनी सांगितले.

कदम म्हणाले की, माझ्या अर्जाचा विचार करून मला जामीन दिल्याबद्दल मी उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाचा आभारी आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे निराधार आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा जो पैसा वाटण्यात आलेला आहे, तो कर्ज रूपाने वाटण्यात आलेला आहे. तो कर्ज आहे. तो पैसा मी घेतला असेल तर मलाही तो परत करायचा आहे. तसेच, मातंग समाजातील कोणत्याही लाभार्थ्याने घेतला असेल तर परत करायचा आहे. तो पैसा कर्ज आहे, करप्शन नाही.

पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा मला अंदाज नाही. मी येत्या आठ ते पंधरा दिवसांत मोहोळमध्ये जाऊन मतदारांशी बोलणार आहे. मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून त्यानंतरच राजकीय निर्णय घेणार आहे, असेही रमेश कदम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT