Kolhapur GramPanchayat News: ‘तू खुर्चीवरून उठ’ म्हणताच सरपंचांचे पती अन्‌ ग्रामपंचायत सदस्यात ‘फ्री स्टाईल’ हाणामारी

Kolhapur Gram Panchyat Fight News: उपस्थित सदस्यांनी दोघांना समजावून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू होती.
Gram Sabha
Gram SabhaSarkarnama

Kolhapur News : ग्रामपंचायतीची मासिक सभा आणि ग्रामसभेच्या तारखेबाबत एकमत न झाल्याने सरपंचांचे पती आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला. त्या वादातच सरपंचांच्या पतीने संबंधित ग्रामपंचायत सदस्याला ‘तू खुर्चीवरून उठ’ असे म्हटले, त्यामुळे दोघांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयातच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाली. या फ्री स्टाईल हाणामारीची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. (Sarpanch's husband and Gram Panchayat members fight 'free style' in the office itself)

हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा ग्रामपंचायत कार्यालयात घडला आहे. ग्रामपंचायतीची येत्या आठवडाभरात मासिक सभा आणि ग्रामसभा होणार आहे. तत्पूर्वीच हा प्रकार घडल्याने कळंबा गावात खळबळ उडाली आहे.

Gram Sabha
Shivsena Local Leader opposed to Wakchaure : गद्दार नको, खुद्दार हवा; भाऊसाहेब वाकचौरेंच्या प्रवेशाला ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक होऊन नऊ महिने झाले आहे, तरीही प्रशासनाने समित्या स्थापन केलेल्या नाहीत. त्यामुळे सदस्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. त्याचीही किनार या वादाला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.

याबाबतची माहिती अशी की, येत्या आठवडाभरात ग्रामसभा आणि मासिक सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी सरपंचांचे पती आणि एका सदस्य अशा दोघांत ही सभा कधी घ्यायची याबाबत चर्चा सुरू झाली. दोघांमध्ये एकमत न झाल्याने त्याचे वादात रूपांतर झाले.

Gram Sabha
BJP MLA Will Split : काँग्रेस भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत; १५ ते २० आजी-माजी आमदार फुटणार?

त्याचवेळी सरपंचाच्या पतीने सदस्याला ‘तू खुर्चीवरून उठ’ असे म्हटल्याने सदस्याच्या रागाचा पारा अनावर झाला, त्यातून वाद उफाळला आणि दोघांमध्ये 'फ्री स्टाइल' पद्धतीने हाणामारीचा प्रकार घडला. कार्यालयात उपस्थित सदस्यांनी दोघांना समजावून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू होती.

Gram Sabha
Kolhapur Politics : 'शाहू महाराजांबद्दल आदरच; पण...' ; लोकसभा उमेदवारीच्या चर्चेवर सतेज पाटलांची प्रतिक्रिया

दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने बांधकाम समिती, पाणीपुरवठा समिती, ग्राम आरोग्य समिती, लेखापरीक्षण, बाल हक्क संरक्षण, वनहक्क समिती, ग्राम कृषी विकास नानाजी देशमुख कृषी संजीवनी समितीवर प्रत्येकी एका सदस्याची निवड करावी, अशी मागणी सदस्यांमधून व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com