Ramesh Kadam Released From Jail : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांची आठ वर्षांनंतर जेलमधून सुटका

NCP Former MLA : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदम यांना अटक करण्यात आली होती.
Ramesh Kadam
Ramesh Kadam Sarkarbana

Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची आज (ता. २० ऑगस्ट) ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे. तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कदम कारागृहातून बाहेर आले आहेत. सुटकेनंतर कदम यांचे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले. (Former NCP MLA Ramesh Kadam released from jail after eight years)

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे रमेश कदम हे अध्यक्ष होते. त्या कालावधीत त्यांनी अनेक बनावट लाभार्थी दाखवून शेकडो कोटींचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या गैरव्यवहारप्रकरणी कदम यांना आठ वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती.

Ramesh Kadam
Gram Panchyat News : ‘तू खुर्चीवरून उठ’ म्हणताच सरपंचांचे पती अन्‌ ग्रामपंचायत सदस्यात ‘फ्री स्टाईल’ हाणामारी

तब्बल आठ वर्षांनंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार कदम यांची आज ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे, सोलापूर अशा विविध ठिकाणावरून मातंग समाज कार्यकर्ते जमले होते. ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर येताच मातंग समाजाकडून रमेश कदम यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

दरम्यान, कारागृहातून सुटका हेाताच ते मुंबईतील बोरवली या त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. त्यांनी मोहोळ या मतदारसंघातून २०१४ त्यानंतर २०१९ मध्ये तुरुंगात अपक्ष निवडणूक लढवली होती.

Ramesh Kadam
Shivsena Local Leader opposed to Wakchaure : गद्दार नको, खुद्दार हवा; भाऊसाहेब वाकचौरेंच्या प्रवेशाला ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी अटक झाल्यानंतर रमेश कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. या गैरव्यवहाराबाबत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी कदम यांच्यावर थेट आरोप केला होता. अण्णाभाऊ साठे महामंडळात २५० कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे ३७०० पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले आहेत, असा दावाही ढोबळेंनी केला हेाता.

Ramesh Kadam
Kolhapur Politics : 'शाहू महाराजांबद्दल आदरच; पण...' ; लोकसभा उमेदवारीच्या चर्चेवर सतेज पाटलांची प्रतिक्रिया

महामंडळाचे अध्यक्ष असताना रमेश कदम यांनी ७३ जणांची भरती कोणतीही प्रक्रिया न राबवता केली होती. नियुक्त कर्मचाऱ्यांना गृहकर्ज म्हणून २० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यातील सुमारे १५ लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले होते. अनेक प्रकरणांवर बनावट सह्या करण्यात आल्या होत्या. परस्पर लाभार्थींचे धनादेश वाटण्यात आले होते. रमेश कदम यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळातही ६ कोटी ५६ लाख रुपये वाटल्याचा आरोप होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com