Ramraje Nimbalkar News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramraje Nimbalkar News: रामराजेंनी डाव टाकला; 'लोकसभेला माढ्यातून संजीवराजेच, ...तर त्यांनाही तिकीट मिळू देणार नाही!'

उमेश भांबरे :सरकारनामा

Phaltan Ramraje Nimbalkar News: माढा मतदारसंघातून संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी आम्ही लोकसभेचे तिकीट मागणार आहोत.तिकीट न मिळाल्यास काय करायचे ते त्यावेळी ठरवू,आता त्याची चिंता नाही.संजीवराजेंना तिकीट मिळावे म्हणून मी जीवाची पराकाष्ठा करणार आहे.उमेदवारी नाही मिळाली तर खासदारांना सुद्धा मिळू देणार नाही. त्यांनी उमेदवारीसाठी कितीही पराकाष्ठा करावी आणि कुठेही जावे, असा इशारा माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे जाहीर मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Nimbalkar) बोलत होते.यावेळी आमदार दीपक चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर,सुभद्राराजे नाईक निंबाळकर अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माण,खटाव,उत्तर कोरेगाव,खंडाळा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रामराजे म्हणाले,आजचा मेळावा मनमोकळेपणाने बोलण्यासाठी असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे फोटो बॅनरवर नाहीत.ते असते तर मनमोकळेपणाने बोलता आले नसते. म्हणूनच त्यांचे फोटो टाकलेले नाहीत.आमच्या पण भावना समजून घ्या असेही त्यांनी स्पष्ट केले.

रामराजे म्हणाले,नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) कृपेने अपघाताने आपले खासदार निवडून आलेले आहेत.ज्याला फलटणच्या बाहेर काय आहे,हे माहिती नव्हते. तो दिल्ली बघायला लागला.जो सांगलीच्या तुरुंगात होता, तो आमदार झाला आणि हे जिल्ह्यावर राज्य करायला लागलेत.हे कसे सहन करायचे.मोदींशिवाय हे जगू शकत नाही आणि भाजपशिवाय हे राहू शकत नाही,असा टोला खासदार रणजितसिंह निंबाळकर (RanjitSinha Nimbalkar) व आमदार जयकुमार गोरे यांचा नामोल्लेख टाळून रामराजेंनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींच्या नावावर 30 ते 40 टक्के मते मिळत असल्याने ते अपघाताने खासदार झाले असून हिंमत असेल तर त्यांनी लोकसभेला अपक्ष उभे राहावे.मी पण अपक्ष राहतो, कोण कोणाला निवडून देतो हे बघू असे आव्हान रामराजेंनी देऊन संजीवराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळवून देणारच आहे.पण,मिळाली नाही तर,विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी मिळू देणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

रामराजे म्हणाले, सोशल मीडियावर कोणी यांच्याविरोधात पोस्ट टाकली तर हे फोनवरून त्यांना धमकवतात. त्यामुळे तुम्ही घाबरू नका,त्यांनाही त्याच भाषेत उत्तर द्या.मग कसे ते गप्प बसतात बघा.यांच्यामुळे भावी पिढीचे नुकसान होणार असून जर तुम्हाला पुढील पिढीला वाचवायचे असेल तर संजीवराजेंशिवाय पर्याय नाही.त्यांना लोकसभेत पाठवावेच लागेल असे आमदार रामराजे यांनी स्पष्ट केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT