Loksabha Election 2024 : विरोधकांनी घेरलेल्या नारायण राणेंच्या मदतीला धावले केसरकर; केला 'हा' मोठा दावा

Political News: राज्यसभेच्या खासदारांना लोकसभेत पाठविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे.
Deepak Kesarkar-Narayan Rane
Deepak Kesarkar-Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Marathi News : लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु असून आतापासूनच वातावरण तापायला लागले आहे. निवडणुकीच्या आखाड्यात कोणकोण उतरणार याची चर्चा जोरात रंगली आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या खासदारांना व दिग्ग्ज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची रणनीती आखली असल्याचे समजते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरणार की नाही ? याबाबत जोरात चर्चा सुरु असताना याबाबत शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे.

राज्यसभेच्या खासदारांना लोकसभेत पाठविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. त्यामुळे येत्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणेंना सुद्धा लोकसभेच तिकीट देऊन रिंगणात उतरविण्याची मोदींची रणनीती असू शकते.

Deepak Kesarkar-Narayan Rane
Congress Leader Statement: काँग्रेसच्या खासदाराचे वादग्रस्त विधान; म्हणाले,'दक्षिण भारताला स्वतंत्र देश जाहीर करा'

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर ते नक्कीच विजयी होतील, असे सांगत दीपक केसरकर यांनी विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपातील हवा काढली आहे.

नारायण राणे यांच्यावर कोकणातील जनतेचे प्रेम आहे. त्यांनी कोकणातील नागरिंकाचे प्रश्न सोडवत अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे येत्या काळात ते उमेदवार असतील तर त्यांना शंभर टक्के पाठिंबा असेल, असे मत व्यक्त करताना नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असू शकतील, असे संकेत त्यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप नेते नारायण राणे (Narayn Rane) यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी पुन्हा मिळणार नाही, असा दावा गेल्या काही दिवसापासून विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे नारायण राणे निवडणूक लढविणार का नाही याची चर्चा रंगली होती. विरोधकांकडून केल्या जात असलेल्या टीकेवर राणे यांचे एकेकाळचे विरोधक केसरकर (Deepak kesarkar) यांनी त्यांची बाजू सावरून धरली आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Deepak Kesarkar-Narayan Rane
Narayan Rane : आघाडीत 'एक ना धड भाराभर चिंध्या'; नारायण राणेंचा काँग्रेसवर घणाघात

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com