Ranjitsinh Patil .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News: गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचे मोठे संकेत; दसऱ्यापर्यंत राजकीय भूमिका स्पष्ट करणार

Gokul ex-president Ranjitsinh Patil: पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत गोकुळमधील ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी महाडिक गटाची साथ सोडली. पण आता राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर सत्ता समीकरणे बदलली आहेत.

Deepak Kulkarni

Kolhapur News: गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील हे आपली राजकीय भूमिका दसऱ्यापर्यंत स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे कागलच्या राजकारणातील एक वेगळे वळण घेताना पहावयास मिळणार आहे. नुकतीच त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांचे बैठक बोलावली होती. यामध्ये राजकीय दिशा ठरवण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली. हा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार कार्यकर्त्यांनी रणजीतसिंह पाटील यांच्यावर सोपवले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एकनाथ कमळकर होते.

रणजितसिंह पाटील म्हणाले, गोकुळ(Gokul) दूध संघासह जिल्हा परिषद व इतर संस्थांमध्ये काम करत असताना गटातटाचे राजकारण न करता सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडी - अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न राहणार आहे. काही अपरिहार्य कारणामुळे मी शांत बसलो होतो याचा अर्थ मी राजकारण किंवा समाजकारण सोडले असा होत नाही,असंही त्यांनी सांगितलं.

तसेच जर कोण पाटील गटाची ताकद संपली.असं कोण म्हणत असेल तर त्याला येणारा काळच उत्तर देईल. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद (ZP) पंचायत समिती व मुरगुड नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीने उतरून कामाला सुरुवात करावी.

विश्वजीत पाटील म्हणाले, अडचणीच्या काळात देखील सर्व कार्यकर्त्यांनी रणजीत पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.यापुढे अधिक तकदीने कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे. मधुकर करडे म्हणाले, पाटील बंधूंच्या दुफळीमध्ये गटाचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे दोन्ही बंधूंनी कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन योग्य ते निर्णय यापुढील निवडणुकांमध्ये घ्यावेत.

पाटील गटामध्ये दोन बंधूंचे वेग - वेगळे दोन गट झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहे. कार्यकर्त्यांचा विचार करुन नगरपरिषद व अन्य निवडणूकांमध्ये दोन्ही बंधू एकत्रित येणार काय ? यावर रणजितसिंह पाटील यांनी टाळी एका हाताने वाजत नाही, असे उत्तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिले.

यावेळी दत्तात्रय पाटील,संभाजी पाटील(बेळवळे),बबनशिंत्रे,शामराव तिकोडे (हळदी ),आनंदा पाटील (म्हाकवे),आप्पाजी मेटकर,महादेव तिप्पे (तमनावाडा),एस.डी.मोरे (बाळेघोल) यांचीही भाषणे झाली. यावेळी बजरंग सोनुले,अशोक खंडागळे, दत्ता जाधव,आनंदा पाटील, संजय एकल,राजाराम लाडगावकर,शंकर इंगवले,गजानन पाटील, के.डी. मेंडके,मधुकर खाटकी, सदाशिव सुळकुडे आदी उपस्थित होते.

पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत गोकुळमधील ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी महाडिक गटाची साथ सोडली. पण आता राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर सत्ता समीकरणे बदलली आहेत.

महायुतीमधील राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनेचे सर्वच आमदार पदाधिकारी गोकुळच्या निवडणुकीत महायुती म्हणून उतरणार आहेत. अशातच मंत्री मुश्रीफ यांच्याकडे या निवडणुकीतील नेतृत्व जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंगळे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT