Ajit Pawar Video: महिला पोलिस अधिकाऱ्यावर 'दादागिरी'; अडचणीत सापडलेल्या अजितदादांच्या मदतीला शरद पवारांचा लाडका नेता पुढे आला

Ajit Pawar Dispute with ips Anjali Krishna: उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या कडक शिस्त आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. पण आता याच अजितदादांचा एक व्हिडीओ गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना चांगलंच सुनावत असल्याचं दिसून येत आहे
Ajit Pawar Video
Ajit Pawar VideoSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या कडक शिस्त आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. पण आता याच अजितदादांचा एक व्हिडीओ गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना चांगलंच सुनावत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. या व्हिडीओमुळे अडचणीत सापडलेल्या 'काका'च्या मदतीसाठी आता विरोधी पक्षात असलेला आमदार पुतण्या पुढे आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवारांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत अजितदादांची बाजू घेतली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसत असल्याचं म्हटलं आहे.

वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली 35-40 वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असल्याचंही रोहित पवार (Rohit Pawar) आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा असल्याचंही आवर्जून सांगितलं.

Ajit Pawar Video
Milind Deora Tweet: आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी देऊ नका म्हणणाऱ्या खासदार देवरांचा यू टर्न? राऊतांनाही फटकारलं; म्हणाले...

त्यांनी यावेळी आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं, असा सल्लावजा इशाराही आमदार रोहित पवारांनी ट्विटमधून दिला आहे. यावेळी त्यांनी आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधत राहू असंही नमूद केलं आहे.

Ajit Pawar Video
Dhairyasheel Mohite Patil : केंद्रीय मंत्र्यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना मोठी भेट; सर्वाधिक लाभ जयकुमार गोरेंच्या माणला!

उपमुख्यमंत्री अजितदादांनी करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना अवैध उत्खननावरील कारवाई रोखल्याची टीका केली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अजित पवार यांनी या प्रकरणावर आपली बाजू ट्विटच्या माध्यमातून मांडली आहे. त्यानंतर,त्यांच्या मदतीला धावून येतानाच आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या भूमिकेचं एकप्रकारे समर्थनच केल्याचे दिसून येत आहे.

Ajit Pawar Video
Bjp News : एकनाथ शिंदेंना बाजुला सारून भाजपचा स्वबळाचा फॉर्म्युला? अमित साटम लागले कामाला, रणनीती ठरली!

अजित पवारांची सारवासारव...

अजित पवारांनी या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

तसेच त्यांनी पुढे ट्विटमध्ये आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर असल्याचं म्हटलं आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे," असंही अजितदादा ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

Ajit Pawar Video
Maratha Reservation Exclusive : ‘मराठ्यांना GR पटलाच नव्हता’; टीम जरांगेमधील वकीलानेच केला मोठा दावा

मिटकरींचं थेट UPSCला पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट UPSCला पत्र लिहिलं आहे. या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडेबोल सुनावलेल्या महिला IPS अधिकाऱ्याबाबत मोठी मागणी केली आहे. यात मिटकरी यांनी अजित पवारांशी वाद घालणाऱ्या IPS अंजली कृष्णा यांचं जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन घ्या, अशी मागणी मिटकरी यांनी थेट UPSCला पत्र लिहून केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com